करमाळा बाजार समितीत सचिव पदावरून वाद रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:01+5:302021-06-02T04:18:01+5:30
यावेळी सभापती शिवाजी बंडगर यांनी सचिव सुनील शिंदे यांना मुदतवाढ नाकारण्याच्या बाजूने विशेष मताचा अधिकार वापरला होता. त्यामुळे सचिव ...
यावेळी सभापती शिवाजी बंडगर यांनी सचिव सुनील शिंदे यांना मुदतवाढ नाकारण्याच्या बाजूने विशेष मताचा अधिकार वापरला होता. त्यामुळे सचिव शिंदे यांना मुदतवाढ नाकारण्यात आली. सभापती बंडगर व दिग्विजय बागल यांनी शिफारस केलेल्या राजेंद्र पाटणे यांना सचिव करता येत नसल्याची भूमिका माजी सभापती जयवंतराव जगताप यांनी घेतली होती. सोमवारी सचिव सुनील शिंदे यांना निरोप देत असतानाच प्रभारी सचिव राजेंद्र पाटणे यांना पदभार देण्याचा विषय वादाचा ठरला. सेवाज्येष्ठतेनुसार विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.
----
सुनील शिंदे यांनी सभापतींच्या आदेशाचा अवमान केला आहे. त्यांच्याविरुद्ध आपण तक्रार केली आहे. आज आम्ही नवीन सचिव म्हणून राजेंद्र पाटणे यांना आदेश देण्याबाबत बाजार समिती कार्यालयात गेलो होतो मात्र शिंदे यांनी दुसऱ्याच व्यक्तीला पदभार दिला.
- शिवाजी बंडगर,सभापती
----
सचिवाची मुदतवाढ ही पणनच्या अधिनियमान्वये सेवा ज्येष्ठतेनुसार होणे आवश्यक आहे. त्यानुसार मी आज सेवानिवृत्त होत असल्याने विठ्ठल क्षीरसागर हे ज्येष्ठ असल्याने त्यांच्याकडे आपण सचिवपदाचा प्रभारी चार्च सोपवला आहे.राजेंद्र पाटणे यांच्यावर सेवेत शास्ती झाली आहे.
- सुनील शिंदे,तत्कालिन सचिव.
----
सेवानिवृत्त होणारे सचिव सुनील शिंदे यांनी सभापती या नात्याने माझी परवानगी घेऊन चार्ज द्यावयास हवा होता. त्यांनी चुकीचे काम केलेले असल्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करणार आहोत.
- शिवाजी बंडगर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, करमाळा
---