जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या मुदतवाढीवरुन सोलापूर जिल्हा परिषदेत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 11:09 AM2020-07-02T11:09:05+5:302020-07-02T11:10:42+5:30

डॉक्टरांच्या निवृत्तीबाबत शासनाचे परिपत्रक नाही; सीईओ म्हणतात तोंडी मार्गदर्शनावर घेतला निर्णय

Dispute in Solapur Zilla Parishad over extension of term of District Health Officer | जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या मुदतवाढीवरुन सोलापूर जिल्हा परिषदेत वाद

जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या मुदतवाढीवरुन सोलापूर जिल्हा परिषदेत वाद

Next
ठळक मुद्देआषाढी एकादशीनिमित्त डॉ. जमादार हे पंढरपूरच्या व्यवस्थेत असल्याचे सांगण्यात आलेडॉ. जमादार यांच्याबाबत काय निर्णय झाला याबाबत सर्वानाच उत्सुकता होतीवैद्यकीय अधिकाºयांच्या निवृत्तीचे वय ६0 करण्यात आले आहे

सोलापूर : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी घेतला आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ यांचे ५८ वर्ष पूर्ण झाल्याने जूनअखेर निवृत्त होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले होते. त्याप्रमाणे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दैवज्ञ यांना ३0 जून रोजी कार्यक्रमाद्वारे निरोप देण्यात आला, पण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांचा कार्यक्रम न झाल्याने आरोग्य विभागात हा चर्चेचा विषय झाला होता. 

आषाढी एकादशीनिमित्त डॉ. जमादार हे पंढरपूरच्या व्यवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी सकाळी पूजा झाल्यानंतर सर्व अधिकारी सोलापूरला परतले. डॉ. जमादार यांच्याबाबत काय निर्णय झाला याबाबत सर्वानाच उत्सुकता होती. दुपारनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ कार्यालयात आले व त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाºयांशी संपर्क साधून चर्चा केली. वैद्यकीय अधिकाºयांच्या निवृत्तीचे वय ६0 करण्यात आले आहे, त्यामुळे डॉ. जमादार यांच्या निवृत्तीचा प्रश्नच उदभवत नाही असे  स्पष्टीकरण मिळाल्याचे सांगत  जमादार यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचे वायचळ यांनी सांगितले़

काय आहे निवृत्तीचा वाद...
आरोग्य खात्यातील डॉक्टरांच्या निवृत्तीबाबतचा वाद न्यायालयात गेला आहे. न्यायालयाने निवृत्तीच्या वयावर शिक्कामोर्तब केले आहे. कोरोनाची साथ झाल्यानंतर याबाबत परिपत्रक जारी केले जाईल असे शासनाने स्पष्टीकरण दिले होते. पण ते परिपत्रक न निघाल्याने डॉक्टरांची निवृत्ती कधी हा वाद कायम राहिला आहे. याचाच आधार घेत डॉ. जमादार यांची सेवा कायम सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतला आहे.   
  
जमादार म्हणाले होते बदली करा
विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी यापूर्वीच आरोग्य खात्याला विनंती अर्ज केला आहे. वयोमानाप्रमाणे व कौटुंबिक कारणामुळे जबाबदारी पेलता येत नसल्याने इतरत्र साईड पोस्टिंग द्यावी असे म्हटले होते. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सक्षम आरोग्य अधिकारी हवा अशी मागणी सदस्यांतून होत आहे. 

आरोग्य अधिकाºयाच्या निवृत्तीबाबत शासनानचे परिपत्रक आलेले नाही. मी याबाबत वरिष्ठ अधिकाºयांचे मार्गदर्शन घेतले आहे. डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६0 असल्याचे सांगण्यात आल्याने डॉ. जमादार यांना मुदतवाढ दिली आहे. 
- प्रकाश वायचळ,
मुख्य कार्यकारी अधिकारी

डॉ. भीमाशंकर जमादार यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे जिल्ह्यात कोरोना वाढत आहे. त्यांना मुदतवाढ जरूर द्यावी पण जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या पदावर नको. डॉक्टरांना निवृत्तीनंतर कार्यकारी पदावर मुदतवाढ देता येत नाही असे मला वाटते त्याची माहिती घ्यावी लागेल.  
- उमेश पाटील, झेडपी सदस्य

Web Title: Dispute in Solapur Zilla Parishad over extension of term of District Health Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.