समृद्ध स्पर्धेतील गावांना बांबूची रोपे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:16+5:302021-09-19T04:23:16+5:30
वैराग : बार्शी तालुका पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्धगाव स्पर्धेअंतर्गत बार्शी तालुक्यातील सहभागी बारा गावांना सेट्रीज या संस्थेच्या ...
वैराग : बार्शी तालुका पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्धगाव स्पर्धेअंतर्गत बार्शी तालुक्यातील सहभागी बारा गावांना सेट्रीज या संस्थेच्या मदतीने आठ हजार बांबूची रोपे मोफत देण्यात आली.
खडकोणी, अरणगाव, रस्तापूर, इर्ले, मुंगशी, चिंचोली, मांडेगाव, मुंगशी (आर), सुर्डी, राळेरास, कोरफळे, पिंपरी (पा.) या बारा गावांना या रोपांचा फायदा होत आहे. या गावांमध्ये गत तीन वर्षांपासून ओढा, नदी, नाला याची खोलीकरणाची कामे चांगल्या पद्धतीने केली आहेत. त्यामुळे येथे ओढा नाला यांच्या दोन्ही बाजूला या बांबूची रोपे लावण्यात येत आहेत. ग्रामस्थांनी या रोपांची लागवड ओढा, पांद, नाला आणि नदीकाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी ही रोपे लावावीत, असे आवाहन पानी फाउंडेशनचे सचिन आतकरे यांनी केले आहे.
-----
फोटो : १७ वैराग
पानी फाउंडेशनच्या वतीने बार्शी तालुक्यातील गावांना बांबूची रोपे वाटप करताना सचिन आतकरे.