बार्शीत गरजूंना मोफत रक्तपिशवी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:24+5:302021-04-27T04:22:24+5:30
हा उपक्रम श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या द. ग. कश्यपी सभागृहात पार पडला. यावेळी ...
हा उपक्रम श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या द. ग. कश्यपी सभागृहात पार पडला. यावेळी जैन श्वेतांबर ऋषभ मंदिर देवस्थान ट्रस्टचे बार्शीचे अध्यक्ष प्रदीप बागमार, धनुभाई शाह महावीर सेवा संघ ट्रस्ट बार्शीचे अध्यक्ष सुभाष लोढा, वर्धमान जैन वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब श्रीश्रीमाळ, श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, सामाजिक कार्यकर्ते कमलेश मेहता, बाळासाहेब तातेड, अॅड.दिनेश श्रीश्रीमाळ, दिगंबर जैन समाजाचे रूपेश देवधरे, प्रवीण मांडवकर उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत, मोफत रक्तपिशव्या वाटप केल्या. मागील दोन वर्षांपासून समाज उपयोगी व विधायक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगत कांकरिया म्हणाले, बार्शी शहर व तालुक्यातील जनतेला सकल जैन समाजाच्या वतीने मागील तीन वर्षांपासून टंचाई काळात टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठाही केला होता.
या वर्षी गरजूंना मोफत रक्तपुरवठा करण्याबरोबरच रक्तातील घटक, पॅक सेल, तसेच कोविड प्लाझा आवश्यकतेनुसार मोफत दिला जाणार आहे. या विधायक उपक्रमासाठी बार्शीच्या सकल जैन समाज बांधवांचे सहकार्य मिळाले आहे.
यासाठी गोविंद बाफना, पवन श्रीश्रीमाळ, सागर तातेड, लखन तातेड, प्रशांत बुडूख यांनी परिश्रम घेतले.
फोटो
२६बार्शी-रक्तवाटप
ओळी : भगवान महावीर जयंतीनिमित्त रामभाई शहा रक्तपेढीतर्फे गरजूंना मोफत रक्त पिशवी देताना समाज बांधव.