१५८ विद्यार्थ्यांना कृती पुस्तिकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:15 AM2021-07-12T04:15:12+5:302021-07-12T04:15:12+5:30
पानगाव : येथील झेडपी शाळा क्र. १ आणि शाळा क्र.२, तसेच मुलींची शाळा या तीनही शाळांमध्ये इयत्ता १ ली ...
पानगाव : येथील झेडपी शाळा क्र. १ आणि शाळा क्र.२, तसेच मुलींची शाळा या तीनही शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी अशा १५८ विद्यार्थ्यांना अभ्यासपूरक मासिक कृती पुस्तिकांचे मोफत वाटप करण्यात आले.
पानगाव येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ व पुणे येथील स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान यांनी हा उपक्रम राबविला. ज्याच्याकडे मोबाइल आहे ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. गावातील अनेक विद्यार्थी असे आहेत की, ज्यांना शिक्षणासाठी मोबाइल उपलब्ध होत नाही. यामुळे मुलांना अभ्यासाबरोबर व्यवहार / सामान्य ज्ञान याचीही माहिती मिळणार आहे.यावेळी तीनही शाळेमधील शिक्षक भास्कर ढाकणे, श्रीकृण्ण मुळे, दिनेश भूमकर, बलभीम मोरे, महेश जगताप, रोहिणी जगताप, वर्षाराणी मोहिते, महादेवी स्वामी, सुजाता चोपडे, राधिका वेदपाठक, सोमेश्वर देशमाने, उषा भोसले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सुशील पानसे, अमोल पानसे, ऋषिकेश पानसे, कृष्णाजी पानसे, विक्रम पानसे, प्रथमेश पानसे, सुधीर पानसे, वैभव पानसे, सचिन पानसे, किशोर पानसे, रवींद्र शिंगणापूरकर यांनी परिश्रम घेतले.