अकलूज येथे दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:01+5:302021-07-24T04:15:01+5:30
यावेळी डॉ. श्रेणीक शहा, कैलास गावडे, आर.डी. मोरे, प्रहार अपंग संघटनेचे संपर्कप्रमुख शहाजी देशमुख, जिल्हाध्यक्ष पिंटू भोसले, शिवाजी माने, ...
यावेळी डॉ. श्रेणीक शहा, कैलास गावडे, आर.डी. मोरे, प्रहार अपंग संघटनेचे संपर्कप्रमुख शहाजी देशमुख, जिल्हाध्यक्ष पिंटू भोसले, शिवाजी माने, दत्तू निकम आदी उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथे दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची तत्काळ सोय करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सोलापूर जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप ढेले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
दिव्यांगांची आरोग्य तपासणी व प्रमाणपत्र देण्याचे काम छत्रपती शिवाजी सार्वजनिक जिल्हा रुग्णालयामध्ये डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेजच्या यंत्रणेमार्फत होत असते. या जुन्या व नवीन प्रमाणपत्राची स्मार्ट कार्ड काढून देण्याची यंत्रणा उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथे कार्यान्वित झाली आहे. दिव्यांगांना तपासणीसाठी सोलापूरला जाण्यासाठी टोकन येथे दिले जाईल. प्रमाणपत्रानंतर स्मार्ट कार्ड काढून देण्याचे काम दर शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथे मोफत होईल, असे कार्यालयीन अधीक्षक डॉ. श्रेणीक शहा यांनी सांगितले.
फोटो :::::::::::::::::::
अपंग प्रमाणपत्र शोभा दळवी यांना देताना डॉ. श्रेणीक शहा, किरण साठे व अन्य.