यशकल्याणी संस्थेकडून स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:29 AM2021-02-27T04:29:32+5:302021-02-27T04:29:32+5:30
यशकल्याणी परिवाराकडून ज्ञानदीप स्टडी सेंटरला यशकल्याणी परिवाराकडून स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...
यशकल्याणी परिवाराकडून ज्ञानदीप स्टडी सेंटरला यशकल्याणी परिवाराकडून स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश करे-पाटील होते. यावेळी ते म्हणाले की,
मनातील विवेकदीप तेवता ठेवण्यासाठी वाचन केले पाहिजे. घराला घरपण देण्यासाठी, शहाणपण येण्यासाठी, संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी साहित्य चळवळींची एकविसाव्या शतकातही नितांत गरज आहे.
यावेळेस ज्ञानदीप स्टडी सेंटर मधील यशवंत १३ विद्यार्थ्यांना यशकल्याणी परिवाराकडून सन्मानित करण्यात आले. यामध्ये अक्षय वीर, प्रदीप तळेकर,
अविनाश वाघमोडे,
निखिल साबळे, केतन जगताप, प्रशांत टोने, अक्षय साळुंखे, अक्षय लांडगे, सोमनाथ पाटील,
गणेश शिंदे, कानिफनाथ सातपूते, नितीन रोडगे,
महेश वीर यांचा समावेश होता. यावेळेस अशोक गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्राचार्य नवनाथ मोहोळकर, सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब ढाणे व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज शिंदे यांनी तर आभार अशोक गायकवाड यांनी मानले.
फोटो : २६करमाळा-यशकल्याणी
यश कल्याणी संस्थेत स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचे वितरण करताना गणेश करे-पाटील,रोहित चौधरी.