चपळगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:09+5:302021-09-21T04:25:09+5:30

चपळगाव : पाेलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्यात चपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तम्मा गजधाने यांनी गरजू ...

Distribution of educational materials at Chapalgaon | चपळगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप

चपळगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप

Next

चपळगाव : पाेलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्यात चपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तम्मा गजधाने यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच कोरोनाच्या कठीण सेवा देणाऱ्या आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी सरपंच उमेश पाटील होते, तर व्यासपीठावर उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, महेश पाटील, बसवराज बाणेगाव, आयोजक तम्मा गजधाने यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रा.पं. सदस्या चित्रकला कांबळे, मल्लिनाथ सोनार, परमेश्वर वाले, बापू गजधाने, शंकर म्हमाणे, मुख्याध्यापक सुभाष बिराजदार, श्रावण गजधाने, सुरेश सुरवसे, सायबू म्हमाणे, प्रकाश बुगडे, बाळू गजधाने, विक्रम गजधाने, विनोद गजधाने, अमोल गजधाने, विशाल गजधाने, ज्ञानेश्वर कदम, शंभुलिंग अकतनाळ उपस्थित होते.

--------

फोटो : २० चपळगाव

चपळगाव येथे शैक्षिणक साहित्य वाटप करताना तम्मा गजधाने, उमेश पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, महेश पाटील, बसवराज बाणेगाव.

200921\1549-img-20210919-wa0033.jpg

कोरोना काळातील विशेष कार्यानिमीत्त चपळगाव येथे आशा सेविका व अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Distribution of educational materials at Chapalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.