करमाळ्यात दिव्यांगांसाठी साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:47+5:302021-06-19T04:15:47+5:30

प्रारंभी, करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, करमाळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार, नगर परिषद अधिकारी अश्विनी पाटील, जि.प. सदस्या ...

Distribution of materials for the disabled in Karmala | करमाळ्यात दिव्यांगांसाठी साहित्याचे वाटप

करमाळ्यात दिव्यांगांसाठी साहित्याचे वाटप

Next

प्रारंभी, करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, करमाळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार, नगर परिषद अधिकारी अश्विनी पाटील, जि.प. सदस्या राणी वारे यांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पूजा टकले, शिवम पवार, सोहम माने, बकुळा जगदाळे, उर्मिला शिंदे, सनी जगताप, अस्मा कुरेशी, शरद शिंदे, विकास गोडगे, जोयफ शेख यांना या दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या ३० जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पूजा झोळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी पूजा झोळे यांनी केले, तर आभार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी मानले.

यावेळी नलिनीताई जाधव, शीतल क्षीरसागर, राजश्री कांबळे, स्नेहल अवचर, चंद्रहास निमगिरे, शरद नेटके, अभिषेक आव्हाड, समाधान शिंगटे, सचिन नलावडे, अशपाक जमादार, सर्वेश देवकर, मानसिंग खंडागळे, रामभाऊ नलवडे, काका सरडे, सत्यम सूर्यवंशी, भारत जगदाळे, नंदू पाटील आदींची उपस्थिती होती.

१८करमाळा

दिव्यांगांना व्हीलचेअर देताना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, मुख्याधिकारी वीणा पवार, पूजा झोळे व कार्यकर्ते.

Web Title: Distribution of materials for the disabled in Karmala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.