रोटरी क्लबच्या वतीने राष्ट्र शिल्पकार पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:25 AM2021-09-23T04:25:40+5:302021-09-23T04:25:40+5:30
बार्शी : शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे उत्कृष्ट काम करत असलेल्यांना रोटरी क्लब बार्शी यांच्या ...
बार्शी : शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे उत्कृष्ट काम करत असलेल्यांना रोटरी क्लब बार्शी यांच्या वतीने राष्ट्र शिल्पकार पुरस्काराचे वितरण डॉ. रो. सदानंद भिलेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम सावळे, सेक्रेटरी कौशिक बंडेवार, डॉ. विजयश्री पाटील उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून रोटरी क्लब बार्शी यामार्फत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी शोभा प्रल्हाद रणशूर (बळेवाडी), शमशाद अ. गनी सय्यद (बार्शी), उमेश विष्णू पाटील (काटेगाव), लता रामकृष्ण मोरे (काटेगाव), अजय सदाशिव टोपे (आगळगाव), संगीता संदीप गायकवाड (उपळाई ठों.) प्रो. डॉ. उषा विठ्ठलराव गव्हाणे (बार्शी) यांना पुरस्काराने सन्मानित केले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कार्याची माहिती डॉ. विजयश्री पाटील यांनी सांगितली.
शिक्षकांबद्दलचा आदर विद्यार्थ्यांमध्ये कमी होत चालला आहे. हा आदर वाढण्यासाठी शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या पालकांचीही व समाजाची तेवढीच जबाबदारी आहे, अशी अपेक्षा डॉ. सदानंद भिलेगावकर यांनी व्यक्त केली. यावेळी रोटरी इंटरनॅशनल या संस्थेबद्दल मधुकर डोईफोडे यांनी माहिती दिली. रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम सावळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कारप्राप्त शिक्षक उमेश पाटील व डॉ. उषा गव्हाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सेक्रेटरी कौशिक बंडेवार यांनी केले.
यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विजय शहा, डॉ. नारायण देशपांडे, प्रमोद काळे, सुहास श्यामराज, स्मिता श्यामराज, अमित खटोड, रोहित कटारिया, शैलेश वखारिया, पीयूष कोटेचा, आनंद महाजन, विशाल रगडे, कृष्णा सोमानी, सौरभ गुंदेचा, बळी डोईफोडे, आनंद बेदमुथा व अतुल कल्याणी उपस्थित होते. सूत्रसंचालन नेहा व निकिता शिंदे यांनी केले.
-----
२२बार्शी-रोटरी अवार्ड
राष्ट्रशिल्पकार पुरस्कारविजेते शिक्षक व रोटरी क्लबचे पदाधिकारी.