वनविभागातर्फे शेतकऱ्यांना सेंद्रीय खत व अवजारांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:29 AM2021-02-27T04:29:35+5:302021-02-27T04:29:35+5:30

यावेळी उपस्थित मान्यवरांचा वृक्ष रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी प्रास्ताविकात ...

Distribution of organic manure and implements to the farmers by the forest department | वनविभागातर्फे शेतकऱ्यांना सेंद्रीय खत व अवजारांचे वाटप

वनविभागातर्फे शेतकऱ्यांना सेंद्रीय खत व अवजारांचे वाटप

Next

यावेळी उपस्थित मान्यवरांचा वृक्ष रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी प्रास्ताविकात कार्यकमाचा उद्देश व शासनाच्या विविध योजनाबद्दल माहिती दिली. नगराळे यांनी शेतीची सुपीकता अबाधित ठेऊन उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करणे शेती व शेतकऱ्यांसाठी हिताचे असून रासायनिक खतांच्या दुष्परिणामाचे संकट टाळता येऊ शकेल, असे मत व्यक्त केले.

तसेच वनांना आग लागण्याच्या घटना घडू नयेत यासाठी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी वन विभागास सहकार्य करण्याचे आवाहनही केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गणेश करे-पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखून शेतीमध्ये आधुनिकतेचा व नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. चिकित्सक व प्रयोगशील शेतकरी बनून आपली प्रगती साधली.

टायगर ग्रूपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी वन विभागाला आपले पूर्ण सहकार्य राहील असे स्पष्ट करून, संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वृक्षारोपण, वन्यजीवांसाठी टँकरने पाणी व्यवस्था व अन्य सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणातून प्रमोद झिंजाडे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येत गट शेती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पक्षिमित्र कल्याणराव साळुंके यांनी तर वनरक्षक गणेश झिरपे यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी वन विभागाचे वनपाल दीपाली शिंदे, वनपाल कांतीलाल चेंडगे,वनरक्षक इरफान काझी, वनरक्षक गणेश झिरपे, संभाजी होनप, राजेंद्र जगताप, आर.बी. शेख, पी. डी. गाडे, आर. जी. रेगुडे, एल. बी. गाडे, एस. पी. कांडेकर, एम. टी.शेख, जगन्नाथ शिंदे, बालाजी शिंदे, सातव, पवळ व लाभार्थी शेतकरी तसेच टायगर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

फोटो : २६करमाळा-अवजारे

वनविभागा तर्फे शेतकऱ्यांना शेतीपूरक औजाराचे व खताच्या वाटप प्रसंगी मान्यवर.

----

Web Title: Distribution of organic manure and implements to the farmers by the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.