२३४ आशा स्वयंसेविकांना संरक्षणार्थ साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:41 AM2020-12-05T04:41:03+5:302020-12-05T04:41:03+5:30

कोरोना संसर्ग विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या फेरीच्या अनुषंगाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सोलापूर जिल्हा आरोग्य विभागातर्फे सांगोला तालुका ...

Distribution of protection materials to 234 ASHA volunteers | २३४ आशा स्वयंसेविकांना संरक्षणार्थ साहित्याचे वाटप

२३४ आशा स्वयंसेविकांना संरक्षणार्थ साहित्याचे वाटप

Next

कोरोना संसर्ग विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या फेरीच्या अनुषंगाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सोलापूर जिल्हा आरोग्य विभागातर्फे सांगोला तालुका आरोग्य विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागात होम टू होम सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणामध्ये ६० वर्षीय व्यक्तींचे दुर्धर आजार, सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या लोकांना शोधून त्यांची रॅपिड ॲटिजन टेस्ट व आरटीपीसीआरद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत॔र्गत सेवा बजावणाऱ्या २३४ आशा स्वयंसेविकांची ओळख निर्माण व्हावी म्हणून त्यांना युनिफॉर्मचे वाटप केले जात असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा दोडमनी यांनी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Distribution of protection materials to 234 ASHA volunteers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.