जिल्हा बँकेचे २५ टक्के उद्दिष्ट कमी
By admin | Published: June 20, 2014 12:42 AM2014-06-20T00:42:26+5:302014-06-20T00:42:26+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय: खरीप हंगाम पीककर्ज वाटप
सोलापूर: जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती नसल्याने कर्ज पुरवठा करणे अशक्य असल्याने खरीप हंगाम पीक कर्जाचे जिल्हा बँकेचे उद्दिष्ट २५ टक्क्यांनी कमी करण्यात आले. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बँकर्सच्या बैठकीत हा निर्णय घेतला.
सोलापूर जिल्ह्यासाठी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यापूर्वीच ठरविण्यात आले होते. ते वाटपासाठी अद्याप वेग आलेला नाही. असे असताना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने मागील वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नव्हते. यावर्षी जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कर्ज देण्यासाठी बँक सक्षम नाही. त्यामुळे पीक कर्ज वाटपासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेचे २५ टक्के उद्दिष्ट कमी करुन अन्य बँकांना विभागून दिले. जिल्हा अग्रणी बँकेचे माधव कोरवार, नाबार्डचे व्यवस्थापक विजय काळे, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे आदी उपस्थित होते.
----------------------
कर्जाचे उद्दिष्ट...
खरीप हंगामासाठी पीक कर्ज उद्दिष्ट- ४५०० कोटी
जिल्हा बँकेला दिलेल्या १११३ कोटींपैकी २७८ कोटींचे उद्दिष्ट कमी केले
जिल्हा बँकेचे कमी केलेले २७८ कोटींचे उद्दिष्ट इतर ११ बँका पूर्ण करणार