करमाळ्यातील त्या खासगी हॉस्पिटलच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:02+5:302021-05-15T04:21:02+5:30
तक्रारीत म्हटले, कोरोना रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करण्यात यावेत याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जागतिक आरोग्य संघटना, भारतीय वैद्यकीय परिषद यांनी ...
तक्रारीत म्हटले, कोरोना रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करण्यात यावेत याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जागतिक आरोग्य संघटना, भारतीय वैद्यकीय परिषद यांनी देशातील सर्व डॉक्टरांना दिलेल्या आहेत. त्यानुसारच कोरोना रुग्णांवर उपचार होणे अपेक्षित आहे. मात्र शहरात परवानगी दिलेल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही. चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. शिवाय काही रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता नसतानाही ती दिली जात आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण बरा होण्यापेक्षा इंजेक्शनचे रुग्णांवर घातक परिणाम होत आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलची तपासणी करावी तसेच तेथे झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करून संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करावी, अशा मागणी ॲड. शिंदे यांनी केली.