जिल्ह्याचे नेते मोहिते-पाटील हाेते अन्‌ मोहिते-पाटीलच राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:24+5:302021-05-03T04:17:24+5:30

आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने विजय सोपा झाल्याचीही चर्चा होत आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपकडून पवार ...

District leaders will remain Mohite-Patil and Mohite-Patil | जिल्ह्याचे नेते मोहिते-पाटील हाेते अन्‌ मोहिते-पाटीलच राहतील

जिल्ह्याचे नेते मोहिते-पाटील हाेते अन्‌ मोहिते-पाटीलच राहतील

Next

आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने विजय सोपा झाल्याचीही चर्चा होत आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपकडून पवार विरोधक आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील पहिल्यापासून सक्रीय होते. त्यांनीच मतविभागणी टाळण्यासाठी एकास एक उमेदवार देत महाविकास आघाडीला शह देण्याची रणनिती आखली होती. त्याला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रशांत परिचारक यांनी महत्त्वाचे सहकार्य केले. तर राष्ट्रवादी महाविकास आघाडीकडून अजित पवारांचे विश्वासू करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे सुत्रे सांभाळत होते. त्यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह मोठी टीम होती. त्यामुळे या निवडणुकीदरम्यान संजय शिंदे व रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी स्पर्धा असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

प्रचारादरम्यान दोघांनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे या निवडणुकीत मोहिते-पाटील की शिंदे यांच्या नेतृत्वाचा करिश्मा चालणार याबाबत पंढरपूर-मंगळवेढ्यासह राज्यभर चर्चा रंगली होत

निवडणूक प्रचारादरम्यान मोहिते-पाटील यांना एकटे पाडण्यासाठी अजित पवार, संजय शिंदे यांनी पंढरपुरातील त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांना राष्ट्रवादीत खेचून आणत शह देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निकालानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली तर मोहिते-पाटील, परिचारक नेतृत्व करत असलेल्या भाजपचा उमेदवार प्रथमच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात विजयी करण्याचा करिश्मा चालला आहे. त्यामुळे मोहिते-पाटलांचे पुन्हा जिल्ह्यासह राज्यातील भाजप नेत्यांसमोर निश्चित वजन वाढणार आहे. त्यामुळे सध्यातरी संजय शिंदे यांच्यावर मोहिते-पाटील वरचढ ठरल्याचे चित्र आहे.

निकालानंतरही आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया देत जिल्ह्याचे नेते मोहिते-पाटील होते अन्‌ भविष्यातही मोहिते-पाटीलच जिल्ह्याचे नेते राहतील, असे म्हणत मोहिते-पाटील विरोधकांना आव्हान दिले आहे.

Web Title: District leaders will remain Mohite-Patil and Mohite-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.