जि. प. कर्मचारी बदल्यांचे आदेश मे अखेरपर्यंत होणार प्रक्रिया

By admin | Published: May 6, 2014 07:40 PM2014-05-06T19:40:53+5:302014-05-07T00:52:40+5:30

सोलापूर: जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाने बदल्यांचे आदेश आले असून मे अखेरपर्यंत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.

District Par. Procedure for transfer of employee transfers till the end of the order | जि. प. कर्मचारी बदल्यांचे आदेश मे अखेरपर्यंत होणार प्रक्रिया

जि. प. कर्मचारी बदल्यांचे आदेश मे अखेरपर्यंत होणार प्रक्रिया

Next

सोलापूर: जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाने बदल्यांचे आदेश आले असून मे अखेरपर्यंत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.
जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यासाठीचा आदेश ३ मे रोजी निघाला आहे. बदल्यांची प्रक्रिया मागील वर्षीच्या आदेशानुसारच राबवायची आहे. जिल्हास्तरीय बदल्यांची प्रक्रिया १७ ते २३ मे तसेच तालुकास्तरीय बदल्यांची प्रक्रिया २६ ते ३१ मेदरम्यान राबवायची आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने बदल्यांचा आदेश काढला असला तरी सोलापूर जिल्हा परिषदेत याची कसलीच तयारी नाही. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र शनिवारी आदेश निघाल्याने बदल्या होणार आहेत. शिक्षण खात्याच्या शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधरांच्या पदोन्नतीचा विषय अद्याप पूर्ण झालेला नाही. अशात बदलीस पात्र शिक्षकांची यादी तयार कशी होणार?, हा प्रश्न आहे.
....
चर्चा झाली नावालाच...
रविवार, दिनांक ४ मे रोजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, मुख्य सचिव जे. एस. सहारिया, ग्रामविकासचे प्रधान सचिव एस. एस. संधु, उपसचिव रहाटे यांनी जि. प., आरोग्य, शिक्षक व अन्य संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. एकीकडे ग्रामविकास मंत्र्यांनी संघटना पदाधिकार्‍यांशी बदल्यांच्या धोरणावर रविवारी चर्चा केली असताना दुसरीकडे शनिवारीच बदल्यांचा आदेश निघाला आहे.
....
महसूलची बदल्यांची तयारी
महसूल खात्याच्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांची तयारीही सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी बदलीस पात्र कर्मचार्‍यांची यादी तयार केली जात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले. शासन आदेशाप्रमाणे बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Web Title: District Par. Procedure for transfer of employee transfers till the end of the order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.