जिल्हाध्यक्ष, चालकाच्या प्रसंगावधानाने युवकाचे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:29+5:302021-07-31T04:23:29+5:30
शेवते येथील शेतात काम करत असताना नामदेव ऐवळे यांना विषारी सापाने दंश केला. याबाबत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश ...
शेवते येथील शेतात काम करत असताना नामदेव ऐवळे यांना विषारी सापाने दंश केला. याबाबत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांना माहिती समजल्यानंतर त्यांनी लगेच भोसे येथील गाडीचालक जाफर शेख यांच्या गाडीतून भोसे ते पंढरपूर हे २४ कि.मी.चे अंतर अवघ्या १२ मिनिटात पार करत पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. दरम्यान, डॉ. बोरावके यांना फोनवरून याबाबत कळविले आणि उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे नामदेव ऐवळे यांना वेळेत उपचार मिळाले. पाच दिवसांच्या उपचारानंतर नामदेव ऐवळे यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. आपला प्राण वाचविल्याबद्दल नामदेव ऐवळे यांनी भोसे ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आणि वाहनचालक जाफर शेख यांचा सत्कार केला. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब ऐवळे, डॉ. अंकुश केंगार, माऊली केंगार, विशाल ऐवळे, शिवराम कोरके, डॉ. युवराज श्रीखंडे आदी उपस्थित होते.