निकृष्ट रस्त्याची विभागीय आयुक्तांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:18 AM2020-12-23T04:18:54+5:302020-12-23T04:18:54+5:30

बहुजन हक्क अभियान या संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अनमोल केवटे यांनी नांदणी ते निशाणदार वस्ती रस्ता दीड महिन्यात उखडल्याची तक्रार ...

The Divisional Commissioner took notice of the inferior road | निकृष्ट रस्त्याची विभागीय आयुक्तांनी घेतली दखल

निकृष्ट रस्त्याची विभागीय आयुक्तांनी घेतली दखल

Next

बहुजन हक्क अभियान या संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अनमोल केवटे यांनी नांदणी ते निशाणदार वस्ती रस्ता दीड महिन्यात उखडल्याची तक्रार विभागीय आयुक्ताकडे केली होती. हा रस्ता चार किमी लांबीचा असून, ३.७५ कोटी रुपये त्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. रस्त्याच्या कामासाठी वापरलेले साहित्य दुय्यम दर्जाचे असून, हा रस्ता अवघ्या दीड महिन्यात नादुरुस्त झाला आहे. रस्त्याची चौकशी करून ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली होती.

विभागीय आयुक्तांनी तक्रारीची दखल घेतली. उपायुक्त संजय सिंह चव्हाण यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रातून रस्त्याच्या चौकशीची शिफारस केली आहे. रस्ता निकृष्ट झाला असल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची ही शिफारस आहे.

Web Title: The Divisional Commissioner took notice of the inferior road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.