ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड;  युटोपियन शुगर्सकडून फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 12:24 PM2021-11-04T12:24:04+5:302021-11-04T12:24:09+5:30

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे     युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी ता. मंगळवेढा या कारखान्याने नुकतीच आपल्या ऊस उत्पादक यांना १५० रु.ची दिवाळी ...

Diwali sweet of sugarcane workers; Distribution of Diwali materials from Utopian Sugars to Fada | ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड;  युटोपियन शुगर्सकडून फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्यांचे वाटप

ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड;  युटोपियन शुगर्सकडून फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्यांचे वाटप

googlenewsNext

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
    युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी ता. मंगळवेढा या कारखान्याने नुकतीच आपल्या ऊस उत्पादक यांना १५० रु.ची दिवाळी भेट जाहीर करून गळीत हंगाम २०२०-२०२१ करिता एकुण २२००/- रु.प्रमाणे दर दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून, कामगारांना ही भरघोस दिवाळी बोनस ही दिला आहे.

कारखान्याच्या सभासदांना २५ रुपये प्रमाणे १० किलो साखर तसेच ज्या ठेवीदारांनी कारखान्याकडे १०,००० हजार रुपये ठेव ठेवलेली आहे.अशा सभासदांना सुद्धा २५ रूपयांप्रमाणे १० किलो साखर घरपोच देण्यात आली आहे. फक्त ऊस उत्पादक व कामगार यांचीच दिवाळी गोड न करता,कारखाना प्रशासनाने ऊस तोडणी मजूर यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना ऊसाच्या फडात जाऊन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांच्या शुभहस्ते दिवाळी साहित्याचे वाटप केले व शुभेच्छा दिल्या. 

युटोपियन च्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. साखर कारखानदारीमध्ये सर्वात महत्वाची व पहिली पायरी म्हणजे ऊस तोडणी करणारे कामगार असतात.हे कामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऐन दिवाळीच्या सणामध्ये आपल्या घरांपासून-नातलगांपासून शेकडो किलोमीटर दूर येऊन कडाक्याच्या थंडीमध्ये ऊस तोडणीचे काम करीत असतात.अशा ऊसतोड कामगारांना दिवाळी साजरी करणे अवघड होते. त्यामुळे त्यांना ही दिवाळी साजरा करीता यावी या उद्देशाने कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी कामगारांना ऊसाच्या फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्याचे कीट वाटप करण्यात आले.असा उपक्रम राबविणारा युटोपियन शुगर्स हा परिसरातील कारखान्यामध्ये एकमेव असल्याने कारखान्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: Diwali sweet of sugarcane workers; Distribution of Diwali materials from Utopian Sugars to Fada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.