डिकसळ ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांचा दारुण पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:22 AM2021-01-20T04:22:35+5:302021-01-20T04:22:35+5:30
डिकसळ (ता. सांगोला) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ९ जागेसाठी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत महालक्ष्मी ग्रामविकास पॅनल विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत ...
डिकसळ (ता. सांगोला) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ९ जागेसाठी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत महालक्ष्मी ग्रामविकास पॅनल विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत लक्ष्मी ग्रामविकास पॅनल यांच्यात चुरशीने मतदान झाले होते. मतमोजणीत लक्ष्मी ग्रामविकास पॅनलने ६ जागा जिंकून परिवर्तन घडवले. तर प्रतिस्पर्धी शेकापच्या लक्ष्मी ग्रामविकास पॅनलला ३ जागेवर समाधान मानावे लागले.
यामध्ये वाॅर्ड क्र. १ मधून शेकापचे नीलाबाई भुसनर, रावसाहेब निळे, रत्नाबाई करांडे, वाॅर्ड क्र. २ मधून राष्ट्रवादीचे मिलिंद कुलकर्णी, तुळसाबाई गायकवाड, वंदना चव्हाण वाॅर्ड क्र. ३ मधून राष्ट्रवादीचे अजितकुमार गंगणे, चंद्रकांत करांडे, जिजाबाई करांडे यांनी विजय मिळवला.
कामातून आदर्श करणार
स्थापनेपासून गेली ५० वर्ष डिकसळ ग्रामपंचायतीवर शेकापची सत्ता असूनही विकास कामापासून गाव कोसो दूर होते. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या युवा फळीने ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली शेकापची सत्ता उलथून टाकत दणदणीत विजय मिळवून परिवर्तन घडविले. त्यामुळे विविध समस्यांनी ग्रासलेले डिकसळ गाव आता विकास कामातून आदर्श करणार असल्याचे पॅनल प्रमुख अशोक करताडे यांनी सांगितले.
फोटो ओळ ::::::::::::::::::::
डिकसळ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या लक्ष्मी ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांची विजयी मिरवणूक काढून जेसीबीने गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.