डीजे वाजला, जेसीबी आला... गुलाल उधळला... अन् ७६ जणांवर गुन्हाही नोंदला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:48+5:302021-03-05T04:22:48+5:30
३ मार्च रोजी राजश्री पंडित भोसले (रा. ओझेवाडी) यांची पंचायत समिती उपसभापतीपदी निवड झाली. त्यांनी ओझेवाडी येथील मारूती मंदिरासमोरील ...
३ मार्च रोजी राजश्री पंडित भोसले (रा. ओझेवाडी) यांची पंचायत समिती उपसभापतीपदी निवड झाली. त्यांनी ओझेवाडी येथील मारूती मंदिरासमोरील मोकळ्या जागेत जेसीबीच्या बकेटमध्ये उभारून गुलाल उधळून रात्री मिरवणूक काढली.
या मिरवणुकीत राजश्री भोसले त्यांचे पती पंडित भोसले व त्यांचे समर्थक अनिता गायकवाड, रमेश क्षीरसागर, राहुल गायकवाड, राजेंद्र पवार, रमेश आदमाने, शिवाजी नवले, रोहित पवार, नागनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे, आण्णासो गायकवाड, बाळासो गायकवाड, रमेश गायकवाड, रामचंद्र गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, संतोष गायकवाड, शिवाजी गायकवाड, प्रशांत शिंदे, शिवाजी भोसले, कुलभूषण महामुनी, नवनाथ शिंदे, अजित पवार, महादेव गायकवाड, बंडू क्षीरसागर, दत्तात्रय गायकवाड, मारूती गायकवाड, रोहित पवार, राहुल गायकवाड, विकास कदम, बाळकृष्ण गायकवाड, वैभव कदम, सोमनाथ क्षीरसागर, राजेंद्र शिंदे, बाबा नामदे, ज्योतिर्लिंग गायकवाड सर्व (रा. ओझेवाडी) व अन्य ३० जण सहभागी होते.
वरील लोकांनी कोरोनाचा संसर्ग पसरविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलीस नाईक गजानन माळी यांनी वरील सर्वांविरूध्द भादंवि कलम २६९, २७०, १८८, १४३ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५, भारतीय साथरोग प्रतिबंधक कायदा १८५७ चे कलम २ व ३ प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली. पुढील तपास हवालदार विक्रम काळे करीत आहेत.