... खांद्यावर बसायची अपेक्षा करु नका ! सोलापूरातील यंत्रमागधारकांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी फटकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:20 PM2018-02-13T13:20:01+5:302018-02-13T13:21:35+5:30
केंद्र शासनाच्या वतीने यंत्रमाग उद्योगासाठी उभारण्यात येणाºया मेगा क्लस्टरसाठी जिल्ह्यातील यंत्रमागधारकांनी कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागा जवळजवळ निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या जमिनीची पाहणीही करणार आहेत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : केंद्र शासनाच्या वतीने यंत्रमाग उद्योगासाठी उभारण्यात येणाºया मेगा क्लस्टरसाठी जिल्ह्यातील यंत्रमागधारकांनी कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागा जवळजवळ निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या जमिनीची पाहणीही करणार आहेत. दरम्यान, याबाबत झालेल्या बैठकीत कुंभारी येथील जमिनीचा रुपांतरित कर शासनानेच भरावा, अशी मागणी केली. पाणीपुरवठा दराच्या मुद्यावरुनही कुजबूज केली. त्यावर, ‘जत्रा बघायला हात धरुन नेतोय, खांद्यावर बसायची अपेक्षा करु नका’, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी फटकारले. सर्व काही शासन करेल, अशी अपेक्षा ठेवू नका, असेही त्यांनी सांगितले.
यंत्रमाग क्लस्टर स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीला सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटना आणि टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन पदाधिकाºयांसह वस्त्रोद्योग विभागाचे उपसंचालक किरण सोनवणे, सल्लागार चेतन भट्टड, वस्त्रोद्योग विभागाचे उपसंचालक शिवकुमार, सहायक संचालक शेख, यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, राजू राठी, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश गोसावी, मल्लिकार्जुन कमटम, गोविंद झंवर, गोविंद बुरा, नरसय्या वडनाल, अंबादास बिंगी, अमर पाटील आदी उपस्थित होते.या बैठकीस क्लस्टर योजनेच्या प्राथमिक संकल्पना अहवालास मान्यता देण्यात आली. या अहवालानुसार पुढील आवश्यक प्रशासकीय कामकाज गतीने व्हावे यासाठी पाठपुरावा केला जावा. आवश्यक त्या मंजुºया आणि कागदोपत्री कामकाज पूर्ण केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.
----------------------
प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यास सदस्य तयार
- टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सुमारे नव्वद सदस्य क्लस्टर योजनेसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यास तयार असल्याचे अध्यक्ष गोसावी यांनी सांगितले. यंत्रमाग संघटनेचे राजू राठी यांनीही सदस्य निधी देण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र क्लस्टरसाठी आवश्यक असणारी बारा एकर जागा अद्याप निश्चित झाली नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. भविष्यातील विस्तार, पाण्याची उपलब्धता, वाहतुकीस सोयीस्कर आणि कामगारांची उपलब्धता याचा विचार करून जागा निश्चित करावी, असे भोसले यांनी सांगितले.
--------------
रात्री केली जागेची पाहणी
- मेगा क्लस्टर हा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अजेंड्यावरचा विषय आहे. यंत्रमागधारकांना हवी ती जागा देण्यासही ते तयार आहेत. यापूर्वी प्रशासनाने कुमठे, होटगी, कुंभारी, चिंचोली येथील जागा सूचविल्या होत्या. कुमठे आणि होटगी येथे पाण्याची अडचण असल्याने ही जागा नको, असे यंत्रमागधारकांनी स्पष्टपणे सांगितले. आता त्यांनी कुंभारी येथील जागा जवळ जवळ निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रात्री ७.३० नंतर कुंभारी येथे जाउन जागेची पाहणी केली.