गणपती मंडपात पत्त्यांचा जुगार नको, अन्यथा कारवाई
By रवींद्र देशमुख | Published: September 19, 2023 06:40 PM2023-09-19T18:40:40+5:302023-09-19T18:40:47+5:30
पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार तरतुदींचे पालन करावे. याचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच वर्षाची तुरुंगाची शिक्षा होऊ शकते.
सोलापूर: विघ्नहर्त्या गणेशाची मोठ्या जल्लोषात प्रतिष्ठापना करुन झाली आहे. आता चौकात, गल्लोगल्ली मंडपात विराजमान झालेल्या ‘श्रीं’ची सुरक्षा राखण्याचं काम प्रत्येक मंडळाचं आहे. बाप्पासमोर पत्याचा जुगार खेळू नये अशी खबर पोलिस यंत्रणेला मिळाली तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होतील. पुढच्या वर्षीच्या परवान्याबद्दल गांभीर्यानं विचार होईल, असा सबुरीचा सल्ला पोलीस यंत्रणेनं शहरातील सर्वच गणेशोत्सव मंडळाना दिला आहे.
पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार तरतुदींचे पालन करावे. याचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच वर्षाची तुरुंगाची शिक्षा होऊ शकते. हे उल्लंघन पुढेही चालू राहिले तर प्रत्येक दिवसाला ५ हजाराचा दंड होईल. सदर गुन्हा हा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. या गुन्ह्यात डिजे सिस्टिम जप्त होईल, यासाठी आवाजावर नियंत्रण ठेवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सर्वच उत्सव मंडळांनी केले आहे.
या सूचनांचा अंमल करा
- - मंडपाच्या संरक्षणाची सर्वस्वी जबाबदारी मंडळांनी घ्यावी
- - ‘श्री’ समोर विद्युत रोषणाई करताना खबदारी घेताना वीज मंडळ आणि महापालिकडील तपासणी प्रमाणपत्र असावे.
- - मंडपातील मूर्तीच्या संरक्षणासाठी २४ तास किमान चार स्वयंसेवक तैनात ठेवा.
- - रात्रीच्यावेळी उंदिर, मांजर, शेळी अशांपासून उपद्रव होणार नाही याची दक्षता बाळगा.