शिक्षक भरती एकाच टप्प्यात करा अन्यथा १७ जुलैपासून आंदोलन; भावी शिक्षकांनी दिला इशारा

By संताजी शिंदे | Published: July 11, 2023 02:19 PM2023-07-11T14:19:26+5:302023-07-11T14:19:51+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Do teacher recruitment in one phase or protest from July 17; Future teachers warned | शिक्षक भरती एकाच टप्प्यात करा अन्यथा १७ जुलैपासून आंदोलन; भावी शिक्षकांनी दिला इशारा

शिक्षक भरती एकाच टप्प्यात करा अन्यथा १७ जुलैपासून आंदोलन; भावी शिक्षकांनी दिला इशारा

googlenewsNext

सोलापूर :  राज्यात ५५ हजार शिक्षक भरती एकाच टप्प्यात करून तात्काळ पवित्र पोर्टलला नोंदणी करावी, अन्यथा १७ जुलैपासून आंदोलन करावे लागेल असा इशारा भावी शिक्षकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला.

अभियोग्यता धारक विद्यार्थी संघटनेच्या वतीने डीएड, बीएड धारक असोसिएशनचे राज्यसचिव प्रशांत शिरगुर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने हे निवेदन दिले. निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे, ५५००० शिक्षक भरती एकाच टप्यात करून तात्काळ पवित्र पोटलला नोंदणी सुरू करावी.

स्पर्धा परीक्षा शुल्क एक हजार वरून  कमी करून पूर्ववत करावे. ७५ हजार पद भरती करता परीक्षांचे आयोजन व तारीख जाहीर करावे. परीक्षा सेंटर विभाग स्तरावर न देता स्वतःच्या जिल्हयात देण्यात यावे.२०१७ ची उर्वरित शिक्षक भरती तात्काळ पूर्ण करण्यात यावी. (१९६ संस्था, माजी सैनिकरिक्त अपात्र गैरहजर यादया), सर्व प्रर्वगातील प्रचलित आरक्षणावर आधारीत जागा देण्यात याव्यात. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Do teacher recruitment in one phase or protest from July 17; Future teachers warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.