ओळखलंत का मला; कुणालाही कसं अडवताय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:22 AM2021-04-11T04:22:01+5:302021-04-11T04:22:01+5:30
माळशिरस येथील मुख्य चौकात विनामास्क व नियम तोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना कारवाईपेक्षा चर्चा, वाद-विवाद अशा वेगवेगळ्या संभाषणाला पोलीस तोंड ...
माळशिरस येथील मुख्य चौकात विनामास्क व नियम तोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना कारवाईपेक्षा चर्चा, वाद-विवाद अशा वेगवेगळ्या संभाषणाला पोलीस तोंड देत असल्याचे प्रकार दिसत होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धे म्हणून सध्या पोलिसांवर मोठी भिस्त आहे. नागरिक फक्त पोलिसांच्या भीतीने मास्क वापरताना दिसत आहेत. मात्र, नेतेमंडळी विनामास्क कारवाईत पोलिसांना आपल्या राजकीय ताकदीचा व पदांचा वापर करताना दिसत आहेत. मात्र, यावर पोलीस तुम्ही कोण आहात, यापेक्षा मास्क का घातला नाही हे महत्त्वाचे आहे, असे समजावून सांगताना दिसत आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांसमोर अशा नेतेमंडळींमुळे कारवाईबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
कोट :::::::::::::::::::
कोरोना महामारीचा प्रभाव वाढत आहे. यामुळे सर्व क्षेत्राचे नुकसान होत आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी कारवाईसाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
- उपेंद्र केसकर
अध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत, माळशिरस.