तुम्हीच जिल्हा दूध संघ चालवा की?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:23 AM2021-07-27T04:23:57+5:302021-07-27T04:23:57+5:30
------ संघ अडचणीतून निघेल का? दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांना जिल्हा दूध संघ ...
------
संघ अडचणीतून निघेल का?
दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांना जिल्हा दूध संघ कर्जातून बाहेर येईल का?, अशी विचारणा केली. आम्ही मुंबईतील जागा विक्रीचा प्रस्ताव दिला आहे, तुम्ही परवानगी दिली तर कर्ज कमी होईल, असे पांढरे यांनी सांगितले.
----
टेंभुर्णीच्या जागेची मागणी...
सोलापूर जिल्हा दूध संघाची टेंभुर्णी- कुर्डूवाडी रस्त्यालगत ९ एकर जागेत आईस्क्रीम, दूध साठवण टँक व १०० मे.टन बीज प्रक्रिया प्रकल्प आहे. याचे बाजारमूल्य शासकीय मूल्यांकनानुसार १८ कोटी होते. त्याचे अंदाजे भाडे दरमहा ५ ते ७ लाख रुपये होईल. ही जागा विठ्ठल को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर संघाने ( मल्टिस्टेट) दरमहा २५ हजार रुपयाने भाड्याने मागणी केली आहे. एवढ्या कमी दरात प्रशासक जागा देण्यास तयार नाहीत.
----