सोलापुरात जॉब हवा आहे का ? जाणून घ्या रोजगार मेळाव्याविषयी सविस्तर माहिती
By Appasaheb.patil | Published: September 16, 2022 06:37 PM2022-09-16T18:37:06+5:302022-09-16T18:37:09+5:30
४०० हून अधिक जागा भरणार; १० कंपन्यांचा असणार सहभाग
सोलापूर : कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभाग आणि साई समर्थ विद्या विकास संस्था व अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श नगर, कुमठा नाका, सोलापूर येथे सकाळी 10 वाजता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी मेळाव्यात सामील होण्याचे आवाहन सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, पदवी, स्टाफ नर्स, बी. कॉम., एम.कॉम, बी. एस.सी., एम. एस.सी., केमेस्ट्री, आय. टी. आय. ट्रेनी फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, ईलेक्ट्रिशियन, वायरमन, डिप्लोमा., बी.ई. मेकॅनिकल अशा विविध प्रकारची एकूण ४०० पेक्षा जास्त रिक्तपदे १० उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसुचीत केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. याबाबत काही अडचण आल्यास प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जाधव यांनी केले