मुलांची स्मरणशक्ती वाढवायची का?; तर त्यांना बौद्धिक खेळ खेळायला द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 08:24 PM2022-02-08T20:24:09+5:302022-02-08T20:24:19+5:30

डॉक्टरांचे आवाहन : स्मरणशक्ती कमीने विसरभोळेपणा वाढतो

Do you want to improve children's memory ?; So let them play intellectual games! | मुलांची स्मरणशक्ती वाढवायची का?; तर त्यांना बौद्धिक खेळ खेळायला द्या !

मुलांची स्मरणशक्ती वाढवायची का?; तर त्यांना बौद्धिक खेळ खेळायला द्या !

Next

सोलापूर : ऑनलाइन शिक्षणामुळे एकीकडे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होत आहे. स्मरणशक्ती कमी झाल्यामुळेच विसरभोळेपणा वाढत आहे. यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांना स्मार्ट बनवण्यासाठी त्यांना सापसिडी, बुद्धिबळ, कोडे सोडवणे असे विविध डोक्याला ताण पडेल, असे बौद्धिक खेळ खेळायला द्या, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाकाळामुळे मुले घरीच असल्यामुळे शारीरिक क्रिया कमी झाल्या आहेत. तसेच बुद्धीला चालना मिळत नसल्यामुळे विसरभोळेपणा वाढत आहे. विसरभोळेपणा हा तणावाचा भाग आहे. आणि वयाच्या आधी येणारा विसरभोळेपणा अडचणीचा ठरू शकतो. यामुळे जीवनमान कमी होऊ शकते. विसरभोळापणा वाढत असल्यास मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, चिडचिडेपणा वाढतो हट्टी बनतात. मोठ्यांचा ही विसर भागून वाढत असेल तर त्यांनी भौतिक खेळाडूंसोबत उलटे चालणे, कोडे सोडवण्यासारखे गेम खेळावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येते.

 

पूर्वी २० टक्के लोकांमध्ये विसरभोळेपणा दिसून येत होता. आता ही संख्या वाढून ३० टक्क्यांपर्यंत गेली आहे. उदासीनता हे याचे मुख्य कारण आहे. उदासीनता व तणावमुक्त जीवनासाठी व्यवस्थित झोप, व्यायाम करावे. दररोज थोडा वेळा आपण स्वत:साठी द्यावा, मनात काही ठेवता आपल्या जवळच्या व्यक्तींशी ते शेअर करावे. यामुळे मन हलके होते, यामुळे मेंदूला चालना मिळते.

डॉ. हर्षल थडसरे, मानसोपचार तज्ञ

विद्यार्थ्यांना या अडचणी येतात

मानसिक तणाव वाढत असल्यामुळे मुलांमध्ये अनेक गोष्टी विसरल्यासारखे होने, अभ्यास न होणे. चिडचिडेपणा वाढणे, अशी लक्षणे मुलांमध्ये सुरुवातीला दिसतात. या बाबींकडे आपण जर दुर्लक्ष केले तर त्याचा हा स्वभाव असाच होतो. हे धोकादायक आहे.

सोळा पंचे किती...?

शिक्षण घेत असताना मुलांना मोबाइलवर शिक्षण आवडते. पण काही वेळा ते लवकर स्मरणात राहत नाही. वर्गात शिक्षक हे पाढे घेत असताना ते त्यांच्या लवकरच स्मरणात राहत; पण जेव्हा शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले, त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांचे पाढे चुकले. असा अनुभव अनेक शिक्षकांना आल्याचे शिक्षकांनी सांगितले.

कोट

ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही शिक्षण पद्धतीकडे समान संधी म्हणून पाहतो. प्रत्यक्ष शाळा सुरू नसताना शिक्षण सुरू ठेवण्याची जबाबदारी या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळेच पार पाडता आली. काही अडचणींमुळे शिक्षक किंवा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेला जाता नाही आले तर अशा वेळेस त्यांना ऑनलाईनचा पर्यायच उपयुक्त आहे. ऑनलाईनमुळे शिक्षकांना आपल्या स्वतःच्या ई कॅटेन्टचा वापर करूनही अध्यापन करता येते. ज्यामुळे शिक्षकांचा वेळ आणि मेहनत वाचते. सोबतच हा 'ई-कंटेट' वारंवार ऐकून, पाहून मुलेही आपला अभ्यास पक्का करू शकतात. आपण ऑनलाइन आणि ऑफलाइनचा सुवर्णमध्य साधून जर शिकवले तर नक्कीच मुलांमध्ये आपण चांगली प्रगती होऊ शकेल.

- राजकिरण चव्हाण, प्रयोगशील शिक्षक

शिक्षकांनी वर्गात शिकवलेले लवकर समजते व लक्षात पण राहते. पण ऑनलाइनमध्ये लक्षात राहण्यासाठी अनेक वेळा व्हिडिओ पाहावं लागत. त्याबरोबरच शिकताना येणाऱ्या अडचणी देखील शिक्षकांना वर्गात तत्काळ विचारता येतात. अन्य मित्र-मैत्रिणी सोबत असल्यामुळे अभ्यास करतानाही जास्त मजा वाटते.

-सिमरन आरीफ मोमीन, विद्यार्थीनी, इयत्ता सहावी

 

मोबाइल नेटवर्कच्या अनेक अडचणींमुळे अभ्यासात एकाग्रता मिळत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होत आहे. त्यामुळे ऑफलाइन अर्थात प्रत्यक्ष वर्गातील अभ्यासच मला जास्त आवडतो. व लक्षात लवकर राहते.

आवेज अमजद शेख, इयत्ता सहावी

 

Web Title: Do you want to improve children's memory ?; So let them play intellectual games!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.