घरासमोर दूध घेणाºया डॉक्टर पती-पत्नीस करमाळा पोलिसांनी केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 03:51 PM2020-05-01T15:51:54+5:302020-05-01T15:53:04+5:30
सालसे येथील घटना; मेडिकोज गिल्ड संघटनेतर्फे सोलापूर ग्रामीण पोलीसांचा निषेध
करमाळा : दूध वाल्याकडून घराच्या समोर ओटयावर दूध घेत असताना दोघा पोलिसांनी कुठलीही विचारणा न करता डॉक्टर पती-पत्नीस काठीने बेदम मारहाण झाल्याचा करण्याचा प्रकार बुधवारी रात्री आठ वाजता घडला. या प्रकरणी तालुक्यातील मेडिकोज गिल्ड संघटनेच्यावतीने पोलिसांचा निषेध करण्यात आला आहे.
सालसे (ता.करमाळा येथील डॉ.नंदकुमार शहा आपल्या घरासमोर शेतकरी लहू दत्तात्रय घाडगे यांच्या कडून दूध घेत असताना बुधवारी रात्री आठ वाजता अचानक पणे दोघे पोलीस मोटारसायकलवरुन ( क्र.एमएच १२ जेजी २८६७) आले व तुम्ही बाहेर काय करताय असे म्हणून काठीने मारहान करायला सुरवात केली.
अहो..मी डॉक्टर आहे असे सांगत असतानासुध्दा जोरदारपणे काठीने मारहाण करायला सुरवात केली त्यावेळी माझी पत्नी डॉ. स्रेहल शहा डॉक्टरांना का मारताय असे म्हणत सोडवायला आली असताना त्यांनी तिच्या पायावर सुध्दा जोरदार काठी मारल्याने ती खाली पडली व तिचा पाय फॅक्चर झाला आहे. जखमी पत्नी डॉ.स्रेहल हिला उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिला सोलापूर येथे पुढील उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला आहे.
करमाळा मेडिकोज गिल्ड या डॉक्टरांच्या संघटनेने पोलिसांच्या मारहाणीचा निषेध केला असून, या मारहाणीची चौकशी करण्याची मागणी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.