डॉक्टरांचे अनुभव; व्यायाम, आहाराचे नियोजन अन् विरंगुळ्यातून तणावमुक्तीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 03:16 PM2021-05-25T15:16:56+5:302021-05-25T15:17:03+5:30

 दुसऱ्या लाटेत झाली मोठी दमछाक

Doctor's experience; Efforts to relieve stress through exercise, diet planning and relaxation | डॉक्टरांचे अनुभव; व्यायाम, आहाराचे नियोजन अन् विरंगुळ्यातून तणावमुक्तीचा प्रयत्न

डॉक्टरांचे अनुभव; व्यायाम, आहाराचे नियोजन अन् विरंगुळ्यातून तणावमुक्तीचा प्रयत्न

googlenewsNext

सोलापूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिका, जिल्हा परिषद आणि सिव्हील हॉस्पिटलमधील आरोग्य यंत्रणेची दमछाक झाली आहे. कामाच्या ठिकाणी तणाव, घरातील मंडळींशी बोलणे नाही, वेळेवर जेवण नाही आणि पुरेशी झोपही नाही अशी अनेक डॉक्टरांची स्थिती आहे. त्यातूनही स्वत:चे आरोग्य सांभाळण्याचे नियोजन डॉक्टर मंडळी करत आहेत. या नियोजनाचे अनुभव डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मागील वर्षीच्या तुलेनत यंदा खूपच धावपळ झाली. कामाचा आणि कामाच्या निमित्ताने येणाऱ्या तक्रारी, अडचणींचा ताण डोक्यात घेतला नाही. आपण डॉक्टर आहोत. त्यामुळे संयम राखूनच काम केले. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि आहार महत्त्वाचा आहे. या धावपळीत आता ध्यान करणे शक्य नाही. परंतु, काहीवेळ चालते. जेवणामध्ये दही व ताक असते. तेलकट, तिखट पदार्थ टाळले जातात. प्रोटिन्स मिळतील असेच पदार्थ घेतो.

- डॉ. लता पाटील, वैद्यकीय अधिकारी, बॉईस हॉस्पिटल.

कोरोचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजना आणि लसीकरण अशी दोन प्रकारची कामे यावेळी करावी लागली. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधणे, होमक्वारंटाइन लोक बाहेर पडले म्हणून झालेल्या तक्रारींचा निपटारा, ओपीडीतील कामे, लसीकरणाचे नियोजन, अहवाल पाठविणे अशा कामांमुळे सतत धावपळ सुरू असते. या धावपळीत वजन कमी झाले; परंतु, प्रकृती बिघडू नये यासाठी आहाराचे नियोजन करत आहे. सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वीच जेवण करते, पुरेसे पाणी घेते. प्रोटिन्स मिळावीत यासाठी सकाळच्या नाष्ट्यामध्ये अंडी, ब्रेड घेते. दिवसभरात उसंत मिळाली तर ड्रायफ्रूटही खाते. तणावमुक्ती गाणी ऐकणे, वेबसिरीज पाहण्याचा प्रयत्न करते शिवाय ध्यानधारणाही करते.

- डॉ.सायली शेंडगे, वैद्यकीय अधिकारी, साबळे नागरी आरोग्य केंद्र.

कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने डॉक्टरांवर मानसिक ताण वाढला. रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसोबत आमच्याशिवाय दुसरे कुणीच नसते. त्यांना उपचारासोबत धीर देण्यासाठी आम्ही सकारात्मक राहणे गरजेचे होते. याकाळात आमच्या कुटुंबीयांसोबतच इतर डॉक्टरांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच आम्ही या संकटाचा सामना करू शकत आहोत. रुग्ण बरा होऊन घरी जात असल्याचा आनंद आम्हाला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लागणारे भाज्या व मांसाहारी पदार्थाचे सेवन केले. शरीराला ‘क’ जीवनसत्व गरजेचे असल्यामुळे रोजच्या आहारात अर्धा लिंबूचा समावेश केला. यासोबतच टोमॅटो, द्राक्षे, आंबा व इतर फळे खातो. घरी केलेल्या काढादेखील रोज घेतो.

- डॉ. एच. बी. प्रसाद, औषध वैद्यक शास्त्र तज्ज्ञ, शासकीय रुग्णालय

 

Web Title: Doctor's experience; Efforts to relieve stress through exercise, diet planning and relaxation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.