धक्कादायक; व्यवसायात अपयश आल्याने बार्शीत डॉक्टर पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 01:16 PM2020-09-11T13:16:36+5:302020-09-11T13:16:41+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
बार्शी : अनेक व्यवसाय करुनही अपयश आल्याने नैराश्येतून डॉक्टरपतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना पाटील प्लॉट बार्शी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. विनायक पुरुषोत्तम वरळे (वय ४०, रा. सांगली) मयताचे नाव आहे.
याबाबत शहर पोलिसांत केदार पवार यांनी खबर दिली असून, घटनास्थळी पोलीस मारकड यांनी भेट देऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या व्यक्तीची पत्नी सांगली येथे डॉक्टर आहे. त्याचे वडीलही बार्शीत राहतात. ते इन्कमटॅक्स आॅफिसमधून निवृत्त आहेत. मयत हा त्यांच्यापासून वेगळ्या प्लॉटमध्ये राहत होता. व्यवसायातील अपयश आणि पत्नी सांगलीला डॉक्टर आहे. ती आपल्याकडे परत येण्यासाठी आग्रह धरत होती. या साºया प्रकारामुळे नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस विलास मारकड हे करत आहेत.