भुईमूग नक्की कुठं उगवतो, याची तरी मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती आहे का ? शरद पवार यांचा मार्मिक टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:07 PM2019-03-02T12:07:57+5:302019-03-02T12:10:01+5:30

करमाळा : मराठा आरक्षण, नोटबंदी, शेतकºयांच्या कर्जमाफीच्या भाजपा सरकारने केलेल्या घोषणा फसव्या  निघाल्या असून, या सरकारला शेतकºयांविषयी कसलीही आस्था ...

Does the Chief Minister know about the whereabouts of groundnut? Sharad Pawar's poignant shot | भुईमूग नक्की कुठं उगवतो, याची तरी मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती आहे का ? शरद पवार यांचा मार्मिक टोला

भुईमूग नक्की कुठं उगवतो, याची तरी मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती आहे का ? शरद पवार यांचा मार्मिक टोला

Next
ठळक मुद्देमराठा आरक्षण, नोटबंदी, शेतकºयांच्या कर्जमाफीच्या भाजपा सरकारने केलेल्या घोषणा फसव्या - शरद पवारसरकारला शेतकºयांविषयी कसलीही आस्था नाही. मुख्यमंत्री होण्याअगोदर देवेंद्र फडणवीसांना कोणी ओळखत होतं का? शरद पवारसरकारने शेतकºयांची फसवी कर्जमाफी करून शेतकºयांची क्रूर चेष्टा केल्याचे पवार यांनी सांगितले - शरद पवार

करमाळा : मराठा आरक्षण, नोटबंदी, शेतकºयांच्या कर्जमाफीच्या भाजपा सरकारने केलेल्या घोषणा फसव्या  निघाल्या असून, या सरकारला शेतकºयांविषयी कसलीही आस्था नाही. मुख्यमंत्री होण्याअगोदर देवेंद्र फडणवीसांना कोणी ओळखत होतं का? भुईमूग नक्की कुठं उगवतो, हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का? असा मार्मिक टोला राष्टÑवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांनी आज करमाळा येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना लगावला.

माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात राष्टÑवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा संवाद मेळावा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर रोहित पवार,उमेश पाटील, मनोहर सपाटे,अजिंक्यराणा पाटील, रश्मी बागल, दिग्विजय बागल, प्रभाकर देशमुख, विलासराव घुमरे, विजय कोलते, सुभाष गुळवे, मंदाताई काळे, लतीफ तांबोळी, सुरेश घुले, राजेंद्र फाळके, राजूबापू पाटील, विक्रांत माने, शिवाजीराव बंडगर, अल्ताफ तांबोळी, सतीश नीळ, संतोष वारे उपस्थित होते.

प्रारंभी पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून स्व.दिगंबरराव बागल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाजपा सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या तरी या सरकारने शेतकºयांची फसवी कर्जमाफी करून शेतकºयांची क्रूर चेष्टा केल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर,उमेश पाटील यांची भाषणे झाली. यावेळी रश्मी बागल, दिग्विजय बागल यांनीही मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यास चिंतामणी जगताप, संतोष पाटील, नानासाहेब लोकरे, संतोष देशमुख, गौरव कोलते, अभिषेक आव्हाड, देवा ढेरे, गणेश तळेकर, हरिश्चंद्र खाटमोडे, डॉ.हरिदास केवारे, चंद्रहास निमगिरे, धनंजय डोंगरे, लक्ष्मण गोडगे, लक्ष्मण केकान, डॉ.अविनाश घोलप, प्रकाश झिंजाडे, दिनेश भांडवलकर, रवी शेळके, ज्योतिराम लावंड, कुमार माने, अंकुश जाधव, दीपक राख, आशिष गायकवाड, भारत साळुंके, भागवत पाटील, बाळासाहेब जगदाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले तर आभार अ‍ॅड. ज्ञानदेव देवकर यांनी मानले.

गाडीत रश्मी बागल अन् दिग्विजयच
- कमलादेवी मंदिराकडे जाताना शरद पवार यांच्यासमवेत गाडीत रश्मी व दिग्विजय हे दोघे बहीण-भाऊ होते. 
- राष्टÑवादीच्या कार्यकर्ता संवाद बैठक स्थळी व बागल यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील मोठे नेते अथवा झेड.पी.अध्यक्ष संजय शिंदे, मोहिते-पाटील या दोन्ही गटाचे कार्यकर्ते अनुपस्थित होते.
- माजी आ.शामलताई बागल यांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्याबरोबर प्रभाकर देशमुख, रोहित पवार, मनोहर सपाटे, उमेश पाटील यांच्यासह रश्मी बागल, दिग्विजय बागल व विलासराव घुमरे यांनी स्नेहभोजन केले. यावेळी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपल्या भाषणातून शरद पवार यांनी कोणतेच भाष्य केले नाही.

भाजपला मतदान अन् आम्हाला आरक्षण मागता का ?
- भाजपाच्या नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला सत्तेवर येताच आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांचे पालन गेल्या साडेचार वर्षांत त्यांना करता आले नाही. आपल्या भाषणात  बंडगर यांनी आरक्षणाचा विषय काढला त्यावर  बंडगर हे काही खरं नव्हं.. मत द्या भाजपाला अन् आरक्षण मागता आम्हाला हे वागणं बरं नव्हं असे मिश्किलपणे शरद पवार यांनी सांगितले.

Web Title: Does the Chief Minister know about the whereabouts of groundnut? Sharad Pawar's poignant shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.