तुमच्या मुलाला मोफत प्रवेश मिळालाय का?; फक्त ५१८ जागांवर झाला प्रवेश, ७ मे अखेरची मुदत
By शीतलकुमार कांबळे | Published: May 2, 2023 12:49 PM2023-05-02T12:49:14+5:302023-05-02T12:53:08+5:30
५ एप्रिल रोजी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाल्यानंतर १२ एप्रिल रोजी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
सोलापूर : मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातून ५१८ जागांवर प्रवेश दिला आहे. तर २१६० जणांची मोफत प्रवेशासाठी नोंदणी झाली आहे.
५ एप्रिल रोजी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाल्यानंतर १२ एप्रिल रोजी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त पाठविण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी आरटीईसाठी २९५ शाळांनी नोंदणी केली असून २३२० जागांवर मोफत प्रवेश देण्यात येत आहेत.
जिल्ह्यातून ७,७३८ पालकांनी आपल्या मुलांसाठी अर्ज सादर केला आहे. त्यापैकी २ हजार १६० मुलांची निवड झाली असून, आत्तापर्यंत ५१८ मुलांना प्रवेश मिळाला आहे. निवड झालेल्या यादीमध्ये नाव असलेल्या बालकांच्या कागदपत्रांची तपासणी पडताळणी समितीकडे करण्याची मुदत २५ एप्रिलपर्यंत होती. यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ सात मे पर्यंत असणार आहे.
तालुकानिहाय झालेले प्रवेश
अक्कलकोट - ४५, बार्शी - ६५, करमाळा - ४७, माढा - १४७, माळशिरस - ११०, मंगळवेढा - ०, मोहोळ -५६ , पंढरपूर - १ , सांगोला - ४३ , उत्तर सोलापूर- ४ , दक्षिण सोलापूर - ०, सोलापूर शहर भाग १ - ०, सोलापूर शहर भाग २ - ०