नारीवर जय हनुमान ग्रामविकासआघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:23 AM2021-01-20T04:23:15+5:302021-01-20T04:23:15+5:30

कारी : बार्शी तालुक्यात नारी -नारीवाडीसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास आघाडी व ग्रामविकास ...

Dominance of Jai Hanuman Gram Vikas Aghadi over women | नारीवर जय हनुमान ग्रामविकासआघाडीचे वर्चस्व

नारीवर जय हनुमान ग्रामविकासआघाडीचे वर्चस्व

Next

कारी : बार्शी तालुक्यात नारी -नारीवाडीसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास आघाडी व ग्रामविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीमध्ये जय हनुमान ग्रामविकास आघाडीने आठ जागेवर तर विरोधी आघाडीने तीन जागांवर विजय मिळवला आहे.

अनिल बारगुळे, रुपाली माळी, मंगल डुकरे, नामदेव वाघ, वर्षा पवार, स्वाती रानमाळ, परमेश्वर बदाले, सुनिता माळी, ग्रामविकास आघाडीचे महादेवी कोठावळे, चंद्रकांत भदे, भारत माळी हे तीन उमेदवार निवडले गेले आहेत. आमदार राऊत पुरस्कत जय हनुमान ग्रामविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले.

गोरमाळे येथे सोपल पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रामविकास आघाडी व आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत जनसेवा ग्रामविकास आघाडी यांच्यात लढत झाली, या तीन प्रभागातून दोन्ही गटाच्या १८ उमेदवारात लढत झाली. सिद्धेश्वर ग्रामविकास आघाडीने स्वत:ची सत्ता कायमस्वरूपी ठेवली आहे, राजेंद्र पाटील, उमेश लिंबराज खळदकर, इंदू उद्धव ढेबरे, छबाबाई भुसारे, लक्ष्मण बनसुडे, अरविंद्र शिंदे, जयश्री दत्तात्रय मोरे हे उमेदवार निवडून आले.

ममदापूर येथे राऊत गटांच्या तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीला एक हाती सत्ता मिळाली. तीन प्रभागातून ७ उमेदवार निवडून आले. शामराव गायकवाड, उषा खळदकर, बिभीषण गायकवाड, रेणुका घोडके, सोमनाथ मोरे, आश्विनी मोरे निवडून आले.

Web Title: Dominance of Jai Hanuman Gram Vikas Aghadi over women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.