मुस्तीमध्ये पाटील-जमादार गटाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:22 AM2021-01-23T04:22:53+5:302021-01-23T04:22:53+5:30

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती ग्रामपंचायतीवर बाजार समितीचे माजी संचालक नागराज पाटील व पंचायत समितीचे माजी सभापती भीमाशंकर ...

Dominance of Patil-Jamadar group in Musti | मुस्तीमध्ये पाटील-जमादार गटाचे वर्चस्व

मुस्तीमध्ये पाटील-जमादार गटाचे वर्चस्व

Next

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती ग्रामपंचायतीवर बाजार समितीचे माजी संचालक नागराज पाटील व पंचायत समितीचे माजी सभापती भीमाशंकर जमादार गटाने १५ पैकी १३ जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडवून आणत वर्चस्व स्थापित केले आहे.

माजी सभापती कल्याणराव पाटील व भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाची निवडणूक सत्ताधारी भाजपचे सुनील कळके व महादेव पाटील गटाविरुद्ध नागराज पाटील यांनी पॅनल उभारले होते. वॉर्ड क्रमांक ४ मध्ये सुनील कळके यांचा पराभव करत नागराज पाटील यांनी यश प्राप्त केले. सत्ताधारी गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. मतदारांसमोर विकासकामाचा अजेंडा व प्रचारयंत्रणा यशस्वीरीत्या राबविल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे पॅनलचे प्रमुख नागराज पाटील यांना दहा वर्षांनंतर सत्तांतर घडविणे शक्य झाले आहे.

या गटाचे रमेश चव्हाण, नरसाबाई पाटील, साधना कस्तुरे, बालाजी जमादार, गिरजाबाई कळके, कलावती चव्हाण, शेकप्पा शिंदे, करुणा गायकवाड, जिलेखा मणियार, नागराज पाटील, वैशाली हरे, इलाही तांबोळी, गौतमबुद्ध गायकवाड असे १३ उमेदवार निवडून आले आहेत. विजयानंतर पाटील समर्थकांनी मुस्तीमध्ये फटाके फोडून, गुलाल उधळून जल्लोष केला.

यावेळी कल्याणराव पाटील, नागराज पाटील, भीमाशंकर जमादार, राजेंद्र गायकवाड, नागनाथ सुतार, सिद्धेश्वर कोरे, शैलेश पाटील, विश्वनाथ हिरेमठ, अशोक पाटील, अण्णाराव वाले, आप्पाराव भोसले, नसीर तांबोळी, पंकज पाटील, शशिकांत मोरडे, शेकू मुजावर, महादेव गाडवे, अशोक कस्तुरे, प्रशांत पाटील, देवराज बिराजदार, ज्योतिबा चव्हाण, सुनील कारभारी, पंडित निकम, चिदानंद बिराजदार, सिद्धेश्वर कस्तुरे उपस्थित होते.

---

आदर्श गाव करण्याचा संकल्प

गावचा विकास हा मुख्य उद्देश असून, ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याबरोबरच विविध योजना आणण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवून आदर्श गाव करण्याचा आमचा संकल्प आहे.

- नागराज पाटील

---

फोटो : २२ मुस्ती

मुस्ती ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर पाटील-जमादार गटाने असा जल्लोष केला.

Web Title: Dominance of Patil-Jamadar group in Musti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.