गिरझणी ग्रामपंचायतीवर जनसेवेचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:09 AM2021-01-08T05:09:35+5:302021-01-08T05:09:35+5:30

माळशिरस तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गिरझणी ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल ...

Dominance of public service over Girjani Gram Panchayat | गिरझणी ग्रामपंचायतीवर जनसेवेचे वर्चस्व

गिरझणी ग्रामपंचायतीवर जनसेवेचे वर्चस्व

Next

माळशिरस तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गिरझणी ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत २ अर्ज अवैध ठरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी उर्वरित २५ पैकी ३ अपक्षासह १३ जणांनी निवडणुकीतून माघार घेत निवडणूक बिनविरोध पार पाडली.

या निवडणुकीत प्रभाग १ : गंगूबाई महादेव साठे, शुभांगी अजिनाथ जाधव, रमेश रामचंद्र साठे, प्रभाग २ : मयूर नवनाथ माने, मीनाबाई अशोक चोरमले, किशोर रामदास गिरमे, प्रभाग ३ : सचिन रामचंद्र गायकवाड व राणी विठ्ठल जगदाळे तर प्रभाग ४ : राजेंद्र विठ्ठल माने, जया सतीश पालकर, राणी सोपान माने हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

विजयी उमेदवारांचे सोलापूर विद्यापीठ संस्थाचालक संघटनेच्या अध्यक्षा पद‌्मजादेवी मोहिते-पाटील, राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ. धवलसिंह मोहिते-पाटील, चेअरब्स स्कूलच्या अध्यक्षा उर्वशीराजे मोहिते-पाटील यांनी कौतुक केले. यासाठी शंकरराव मोहिते-पाटील बँकेचे चेअरमन सतीश पालकर, माजी सरपंच विजयसिंग चव्हाण, विजय माने, माजी उपसरपंच जाकीर शेख, हरिभाऊ माने, रामदास माने यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Dominance of public service over Girjani Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.