डोमिसियल क्रेन - कुरकुंज्या पक्षी झाला दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:14 PM2018-03-21T12:14:28+5:302018-03-21T12:14:28+5:30

ज्वारीबरोबर घेण्यात येत असलेल्या करडई उत्पादनाकडे शेतकरी वर्गाने पाठ फिरवली आहे

Dominic Crane - The Curcumin Predity Rarely | डोमिसियल क्रेन - कुरकुंज्या पक्षी झाला दुर्मीळ

डोमिसियल क्रेन - कुरकुंज्या पक्षी झाला दुर्मीळ

googlenewsNext
ठळक मुद्देनव्वदच्या दशकात जिल्ह्यात ज्वारीसह करडईची लागण मोठ्या प्रमाणावर असायचीकुरकुंज्या हे बिया खाणारे स्थलांतरित पक्षी प्रत्येक गावात दिसून यायचे

सुहास ढेंबरे
जेऊर : पर्जन्यामानातील अनियमिततेसह इतर कारणांमुळे पिक पद्धतीत मोठे बदल होत असतानाच प्रामुख्याने ज्वारीबरोबर घेण्यात येत असलेल्या करडई उत्पादनाकडे शेतकरी वर्गाने पाठ फिरवली आहे. परिणामी हे पिक हद्दपार होत असल्याचेच दृश्य करमाळा तालुक्यात दिसून येत असून याचा परिणाम मुख्यत: याच्या बिया अन्न म्हणून वापरणाºया कुरकुंज्या (डोमिसियल क्रेन) या करकोचे पक्ष्यांचे दर्शन आता दुर्मीळ झाले आहे.
साधारणत: नव्वदच्या दशकात जिल्ह्यात ज्वारीसह करडईची लागण मोठ्या प्रमाणावर असायची. करडईचे पिक जोमात आले कि कुरकुंज्या हे बिया खाणारे स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील प्रत्येक गावात दिसून यायचे. थव्याने उडणारे हे पक्षी सातत्याने आढळून यायचे. मात्र, त्यानंतरच्या काळात पर्जन्यामानातील बदल, करडईपेक्षा स्वस्त मिळणाºया खाद्यतेलाचा वाढता वापर, करडईपिकाला अपेक्षित दर न मिळणे या कारणांमुळे याच्या लागवडीबाबत उदासीनता निर्माण होऊ लागली. परिणामी करडईचे क्षेत्र घटत चालले.
गत ५-६ वर्षापासून ते दिसेनासे झालेले करडई पिक बहुतांश तालुक्यातून हद्दपारच झाल्याचे आढळून येत आहे. करडईचे क्षेत्र नसलेल्या या भागाकडे करडई बिया अन्न असणाºया कुरकुंज्यानी जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. करमाळा तालुक्यात जिरायती पट्टा म्हणून ओळख असलेल्या पूर्व भागात करडई लागवड दिसायची. त्या भागात कुरकुंज्या आवर्जून आढळून यायचा. मात्र त्या भागातील पिक पद्धतीतही बदल झाले असून करडई क्षेत्र नष्ट झाले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा विचार केला तर केवळ मोहोळ तालुक्यातील आष्टी तलाव परिसरात कुरकुंज्या पक्षी आढळून येत आहेत. इतर ठिकाणी त्यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे, अशी माहिती पक्षी अभ्यासक प्रा.अरविंद कुंभार यांनी दिली आहे. 

Web Title: Dominic Crane - The Curcumin Predity Rarely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.