अकलूजला विद्युतदाहिनी, कोविड सेंटरच्या ऑक्सिजनसाठी दहा लाखांचा निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:21 AM2021-04-24T04:21:56+5:302021-04-24T04:21:56+5:30
माळशिरस तालुक्यात कोरोना महामारी आरोग्य विभागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यातील नागरिकांची रॅपिड टेस्ट वाढवावी, आवश्यक प्रमाणात ...
माळशिरस तालुक्यात कोरोना महामारी आरोग्य विभागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यातील नागरिकांची रॅपिड टेस्ट वाढवावी, आवश्यक प्रमाणात रेमडेसिविर औषधे मिळावीत, गरिबांसाठी मोफत हॉस्पिटल सुरू करावे, तालुक्यात वेळापूर, नातेपुते, पिलीव येथे कोविड हॉस्पिटल सुरू करावे. लसीकरणासाठी पुरेसा साठा उपलब्ध व्हावा. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी मुख्यालयातच रहावे या प्रमुख मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले.
कोट ::::::::::::::::::::
कोरोना महामारीचा कहर वाढत आहे. तालुक्यात रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड व औषधांची कमतरता भासत आहे. यासाठी धीर न सोडता काळजी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
- राम सातपुते
आमदार, माळशिरस