२५ वर्षानंतर झाला खुला डोणगाव- मनगोळी पाणंद रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:41 AM2021-02-21T04:41:29+5:302021-02-21T04:41:29+5:30
हा रस्ता मोकळा करण्याची सुरुवात निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केली. चार किलोमीटर ...
हा रस्ता मोकळा करण्याची सुरुवात निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केली. चार किलोमीटर पाणंद रस्ता २० ते २५ वर्षापासून शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे बंद आहे. ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून काटेरी झाडे काढून, मुरुम टाकून रस्ता सुरु केला जाणार आहे. दोन गावाला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी सामंजस्याने करुन घ्यावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी वाघमारे व गुरव यांनी यावेळी केले.
यावेळी सरपंच संजय भोसले,
तहसीलदार अभिजीत जाधव, नायब तहसीलदार विजय कवडे, जयंत जुगदार, मंडल अधिकारी पांडुरंग भडकवाड, तलाठी नरसिंह कटकधोंड, ग्रामसेवक मारुती कांबळे ग्रामपंचायत सदस्य नागनाथ चराटे व डोणगाव ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
---
तालुका अभियानाची सुरुवात..
महाराज्यस्व अभियानाची सुरुवात डोणगाव येथून करण्यात आली. उत्तर तालुक्यातील ज्या- ज्या गावातील पाणंद रस्ते बंद आहेत ते गावकरी व तहसीलदार कार्यालयाने संयुक्तरित्या मोकळे करावेत, असे यावेळी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे व गजानन गुरव यांनी केले.
---