कोरोनाला घाबरू नका, भीतीमुळे उद्भवताहेत धाेके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:17 AM2021-06-02T04:17:54+5:302021-06-02T04:17:54+5:30

अनेक शहरांत आयुर्वेद तज्ज्ञांकडून प्राणरक्षक औषधी घेऊन प्रसंगी Ryle's Tube (नाकातून पोटात टाकलेली नळी) मधून औषधी आत सोडत आहेत. ...

Don't be afraid of Corona, fear is the cause of fear | कोरोनाला घाबरू नका, भीतीमुळे उद्भवताहेत धाेके

कोरोनाला घाबरू नका, भीतीमुळे उद्भवताहेत धाेके

Next

अनेक शहरांत आयुर्वेद तज्ज्ञांकडून प्राणरक्षक औषधी घेऊन प्रसंगी Ryle's Tube (नाकातून पोटात टाकलेली नळी) मधून औषधी आत सोडत आहेत. याचा अनेक शहरांत सकारात्मक परिणाम म्हणजे ऑक्सिजन पातळी झपाट्याने सुधारून कैक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. सोलापूर, बीड, औरंगाबाद, नागपूर..ते पुणे, मुंबई, नगरपर्यंत अनेक शहरांतील रुग्णांचे अनुभव आहेत.

गोष्ट साधी आहे. जर भयानक पसरलेली आग (कोरोना) केवळ वाळू, कार्बनडाय ऑक्साइड (ॲलोपॅथी) ने विझत नसेल तर पाणीही (आयुर्वेद) आपण मारतोच ना ! म्हणूनच कोरोनावर मात करून पुन्हा उभं राहू !! फक्त घाबरू नका.

भीती : प्राचीन आयुर्वेद संहितेत आचार्य चक्रदत्त वर्णन करतात. भीरुतस्यरोगकर्तुत्वात : म्हणजे घाबरणाऱ्या व्यक्तीचा आजार बळावतो. विषादोरोगवर्धनानाम् : विषाद म्हणजे दुःख आणि दुःखाने रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. आचार्य चरकांनी हीनसत्व (अल्पसत्व) : म्हणजे मनाने कमकुवत व्यक्तीचीच रोगप्रतिकारकता कमी होते, असे वर्णन केले आहे. मनाचा शरीरावर परिणाम होतो, हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.

आयुर्वेदात भीतीमुळे निर्माण होणारा भयजअतिसार (जुलाब) : वर्णन केलेला आहे. खरं म्हणजे चिंता, भय, शोक, क्रोध, अनिद्रा या मानसिक भावांचा परिणाम थेट शरीरक्रियांवर होतो. याचा संबंध Hormones (Pituitary, Insuline, Drenaline, Serotonin, Dopamine etc.) निर्मितीवर होतो. परिणामी जीवितास धोका उत्पन्न होतो. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या टॉक्सिनमुळे जेवढे मृत्यू होत आहेत, त्यापेक्षा कदाचित जास्त मृत्यू हे रुग्ण जास्त भयभीत झाल्याने होत आहेत. साधं व्यवहारातलं उदाहरण आहे, एखाद्याला बिनविषारी साप चावला आणि तो घाबरला तर भीतीपोटीसुद्धा मृत्यू होतात. त्याचबरोबर रुग्णापर्यंत नकारात्मक बातम्या पोहोचणार नाहीत, याची काळजी घ्या. त्याच्या अवतीभवती सकारात्मक वातावरण तयार करा. रुग्ण होम क्वारंटाइन राहून उपचार घेत असेल तर त्याला आवडतील अशा पुस्तकांची उपलब्धता करून देणे, संगीत, गाणी ऐकणे, स्टोरी टेलसारखे ॲप डाऊनलोड करून वेगवेगळ्य़ा कथा मोबाइलवरून एअरफोन्सवरून ऐकण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणं हे टेक्नोसॅव्ही पिढीचे काम आहे. औषधोपचाराच्या सोबतच, सकारात्मक मानसिकतेकरिता केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजना म्हणजेच आयुर्वेदानुसार, चरक संहितेनुसार अद्रव्यचिकित्सा किंवा सत्वावजय चिकित्सा होय. कित्येक रुग्णांनी या चिकित्सेन्वये मी स्वत: फोन लावून धीर देऊन, माझ्या शिवचरित्र व्याख्यानाच्या क्लिप पाठवित आहे. त्या बघून रुग्ण संपूर्णपणे सकारात्मक होत आहेत.

‘घाबरू नकोस ! मी २४ तास तुझ्यासोबत आहे, गरज वाटली तर मला मध्यरात्रीसुद्धा फोन करू शकतोस.’

हा माझा आश्वस्त करणारा आवाज त्याच्या कानावरती जातो ना, तेंव्हा तो...होम क्वारंटाइन असो की आयसीयूमध्ये ! तो संपूर्णपणे सकारात्मकतेने कोरोनावर मात करून जिद्दीने पुन्हा उभा राहतो म्हणूनच एवढंच सांगेल की, ९८ टक्के लोक... वाचत आहेत, त्यात तुम्ही आहात. ९५ वर्षीय वयाच्या व हाय रिस्क स्कोअर वाढलेल्या कित्येकांनी कोरोनावर मात केलीय. म्हणूनच म्हणतोय कोरोनाला घाबरू नका! मास्क, डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशनसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. बेफिकीर वागणे सोडावे. गाफील राहू नका, तसेच सर्दी, खोकला, ताप, दम लागणे, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्याबरोबर डॉक्टरांकडे जा. पल्स ऑक्सिमीटर हे बोटाला लावायचे यंत्र हवं तर विकत घेणे कधीही चांगले, आपला ऑक्सिजन कोणत्याही परिस्थितीत ९४ च्या खाली जाणार नाही हे प्रत्येक ४/६ तासाला निरीक्षण करा. पातळी सातत्याने खालावत असेल तर ऑक्सिजन बेडकरिता ॲडमिट होणे गरजेचेच आहे. लवकरच जगावरचे हे संकट दूर होणार आहे

_ अमेरिकेतील फायझर कंपनीचे संशोधन अंतिम टप्प्यात आलंय, येत्या काही महिन्यांत, कोरोना विषाणूविरुद्धचे ब्रम्हास्त्र प्रोटीज इनहिबिटिंग (Protease inhibiting) या तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे यापूर्वी एड्स विषाणूविरोधात यशस्वी ठरलंय. थोडक्यात सांगायचं तर जग कोरोनामुक्त होणारच ! आणि पुन्हा पहिल्याप्रमाणे तुम्हा आम्हाला मोकळा श्वास घेता येणार आहे.

Web Title: Don't be afraid of Corona, fear is the cause of fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.