घाबरू नका.. आम्ही तुमच्यासोबत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:22 AM2021-05-12T04:22:21+5:302021-05-12T04:22:21+5:30
ग्रेस काकडे एक वर्षापासून कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. रुग्णांची सेवा करता करता त्यांना कोरोनानं गाठलं. त्यानंतर घाबरून ...
ग्रेस काकडे एक वर्षापासून कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. रुग्णांची सेवा करता करता त्यांना कोरोनानं गाठलं. त्यानंतर घाबरून न जाता उपचार घेतले. फारसा त्रास नसल्याने १० दिवस घरी राहूनच उपचार घेतले. बरे झाले. दरम्यान, त्यांचे पती डॉ. नबीलाल नदाफ (५२) यांनाही लागण झाली. त्या पाठोपाठ मुलगा मोसीन (२१), मुलगी अलसिया (२५) असे एकापाठोपाठ घरातील चौघांना लक्षण जाणवली. तपासणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सर्वांनी वेळेवर उपचार घेतल्याने आम्ही सर्व कुटुंब या संकटातून सुखरूप बाहेर पडलो.
कोरोनाच्या संकटाला न डगमगता समर्थपणे तोंड देऊन शासनाच्या नियमाचं पालन करा. आनंदी राहा, अगदीच बाधा झाली तरी औषधोपचार घ्या. सुखरूपपणे बाहेर पडू शकता, असा स्वानुभव ग्रेस काकडे यांनी सांगितला.
याच रुग्णालयातल्या आरोग्य सेविका प्रमिला वाघमारे यांनाही कोरोना झाला होता. त्यांनीसुद्धा उपचार घेऊन कोरोनावर मात केली. याबरोबरच आरोग्य सेविका सुरेखा वर्दे याही कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांच्यामुळे पती चन्नवीर बुगडे यांनाही कोरोनाचे लागण झाली होती. ते खासगी रुग्णालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात. आपला अनुभव सांगताना हे कुटुंब म्हणाले ‘शारीरिकपेक्षा मानसिकने हरलो होतो. कोणी बोलायचे नाही, भेटायचे नाही, गल्लीत वातावरण तंग बनलेले होते. यामुळे आम्ही सतत टेन्शनमध्ये असायचो, असे वर्दे व वाघमारे यांनी सांगितले.
----
कोट:- एकामागून एक असे माझ्या कुटुंबातील चारजण पॉझिटिव्ह आले होते. आशा प्रसंगी न घाबरता रुग्णालयाशी संपर्क साधून उपचार घेतले. अता आम्ही सुखरूप आहोत. पहिला डोस घेतल्यास शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढते. नागरिकांनी स्वतःहून लस घेण्यासाठी पुढे यावे.
- ग्रेस काकडे, अधिपरिचारिका ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट
----
फोटो:- अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना आजारमधून बरे झाल्यानंतर तत्काळ सेवेत रुजू होऊन रुग्णांना उपचार देताना अधिपरिचारिका काकडे, आरोग्य सेविका वाघमारे, सुरेखा वर्दे दिसत आहेत.
११ वर्दे, वाघमारे, काकडे