वीज थकबाकीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:33+5:302021-09-19T04:23:33+5:30
महावितरण आधिकारी, पदाधिकारी व शेतकऱ्यांची आ. आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आढावा बैठक झाली. यावेळी सिद्धापूर येथे नवीन ३३/११ केव्ही ...
महावितरण आधिकारी, पदाधिकारी व शेतकऱ्यांची आ. आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आढावा बैठक झाली. यावेळी सिद्धापूर येथे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र मंजूर झाले आहे. याबद्दल बैठकीत चर्चा करून हा प्रकल्प लवकर सुरू करण्याच्या सूचना आ. आवताडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी उपकार्यकारी अभियंता शिंदे यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन मंडळ यांचेकडून मंगळवेढा तालुक्यासाठी ४ कोटी ५० लाख आसपास निधी आला आहे. या निधीतून सर्व मागण्यांची पूर्तता करण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करून लोकप्रतिनिधींना दाखवून पुढील कार्यवाही करत असल्याचे सांगितले. या बैठकीस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, माजी सभापती प्रदीप खांडेकर, शिवाजी पटाप, संचालक राजन पाटील, बापूराव काकेकर, येड्रावचे सरपंच रमेश पाटील, नामदेव जानकर, नंदकुमार जाधव,नागेश मासाळ, गौडाप्पा बिराजदार, खंडू खंदारे, बबलू सुतार, संजय बेदरे, महावितरण उपविभागीय अधिकारी संजय. शिंदे यांचेसह अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.
----
ट्रान्स्फाॅर्मरसाठी चर्चा
तालुक्यामध्ये एकूण किती वीजभार आहे, तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात किती ट्रान्सफाॅर्मर मंजूर आहेत, तालुक्यात ६० केव्हीच्या ठिकाणी १०० केव्हीचे किती डी.पी. असावेत या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तालुक्यात बहुतांशी ठिकाणी वीज बिल थकबाकीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांची अर्थिक स्थिती लक्षात घेऊन कार्यवाही करावी, असेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समस्या आणि अडचणी मांडल्या.
----