आमच्या रोजीरोटीवर गदा आणू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:20+5:302021-08-12T04:26:20+5:30
माढा : व्यापाऱ्यांवर बंदच्या रूपात येणारे संकट टाळण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. व्यवसायासाठी माढ्यासह तालुक्यातील बंद ठेवण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून ...
माढा : व्यापाऱ्यांवर बंदच्या रूपात येणारे संकट टाळण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. व्यवसायासाठी माढ्यासह तालुक्यातील बंद ठेवण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी संचारबंदी टाळावी. निर्बंध कठोर करा; पण आमच्या अन्य अवलंबून असलेल्या घटकांच्या रोजीरोटीवर गदा आणू नये, अशी व्यापाऱ्यांनी मंगळवारच्या बैठकीत व्यक्त केली.
शासनाचा महसूल प्रामाणिकपणे भरणारा व्यापाऱ्यांना व्यवसाय बंद करू नका. व्यापारी अडचणीत सापडला आहे. येत्या काही दिवसांत सणवार येणार असून, बंदमुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार आहे. विनंती मान्य केली नाही तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही व्यवसाय सुरू ठेवावा लागणार असल्याची भूमिका दिनेश जगदाळे, महेंद्र शहा, प्रमोद वेदपाठक, नितीन दोशी, तानाजी आवटे, संतोष लुणावत, नागनाथ घाडगे, शिवरत्न नरखेडकर, भारत भाकरे, राहुल पडदुणे, विशाल शहा, चेतन शहा, पांडुरंग गोरे, संदीप कुर्डे आदी शहरांतील विविध व्यापाऱ्यांनी मांडली.
नायब तहसीलदार विजय लोकरे व सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक हनुमंतराव पाडुळे, सचिन घाडगे ॲड. वैभव काशीद, संतोष कोठारे, बंडू भांगे, अनिल साळुंखे, आदेश मेहता, रमाकांत गिरी, सोमनाथ गोसावी, सोमनाथ चवरे, उदय शेलार, सुनील सलगर, दशरथ चवरे, प्रवीण ताकभाते, हरीश रोटे, राजेंद्र मेहता, राहुल मस्के, प्रा. बापूराव घुले, दीपक कदम, संभाजी भांगे, बालाजी साळुंखे, मेजर शिवाजी कदम, जितेंद्र गिड्डे, दत्ता पवार, राजेंद्र कांबळे, सागर बोंबाळे, शांतीलाल झाडे, बालाजी शिंदे, राहुल मिस्कीन, नितीन लोखंडे, प्रदीप नरवडे, विजय मासाळ, सलीम आतार, शांतीलाल झाडे, नेहाल तांबोळी, गौतम शिंदे आदींची उपस्थिती होती.
----
कोविड पार्श्वभूमीवर संचारबंदी लावू नये यासाठी माढ्यातील व्यापाऱ्यांनी नायब तहसीलदार विजय लोकरे यांना निवेदन दिले.
---