तुमचा किमती मोबाइल देऊ नका कोणाला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:26 AM2021-08-21T04:26:19+5:302021-08-21T04:26:19+5:30

सोलापूर : सोशल मीडिया, डिजिटल प्रणालीमुळे प्रगतीचे दालन खुले झाले आहे. तितकाच धोकाही वाढला आहे. आपल्या छोट्याशा मोबाइलवरील क्लिकमुळे ...

Don't give your price mobile to anyone; | तुमचा किमती मोबाइल देऊ नका कोणाला;

तुमचा किमती मोबाइल देऊ नका कोणाला;

Next

सोलापूर : सोशल मीडिया, डिजिटल प्रणालीमुळे प्रगतीचे दालन खुले झाले आहे. तितकाच धोकाही वाढला आहे. आपल्या छोट्याशा मोबाइलवरील क्लिकमुळे गंडा बसू शकतो. वेगवेगळ्या फसव्या लिंक भुरळ पाडून गंडवण्यासाठी टपल्या आहेत. यामुळे आपली पर्सनल माहिती कुठेही शेअर करू नये. अगदी आपल्या जवळचा मोबाइल जरी कोणी अनोळखीने कॉलसाठी मागितला तरीही देऊन नका अन्यथा तुमच्या डोळ्यादेखत बँक खात्यावरील बॅलन्स गायब होऊ शकतो.

सोशल मीडियावरील वेगवेगळ्या फसव्या आमिष दाखवणाऱ्या जाहिराती, ऑफर्समुळे ग्राहक आकर्षिला जातो. मोबाइलवर येणाऱ्या कोणत्याही लिंक अथवा अनोळखी मेसेजेसला उत्तर देताना त्यात कितपत तथ्य आहे. हे पाहणे आवश्यक आहे. अनेकदा आपल्याशी अनोळखी मंडळी संवाद साधताना आपली पर्सनल माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतील. अशा मंडळीपासून लोकांनी सावध राहावे, अशी माहिती सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे व पोलीस उपनिरीक्षक विसेंद्र बायस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

-----

फसवणुकीसाठी अशी वापरली जाती युक्ती

१ एखादा अनोळखी व्यक्ती तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून तुमचा मोबाइल नंबर शोधतात. तुमच्या एटीएम कार्डची व्हॅलिडिटी संपली आहे. आपली माहिती मागवतात. अशा फोनला प्रामुख्याने गृहिणी, वृद्ध मंडळी फसल्या जातात आणि माहिती सांगून मोकळी होतात.

२ आपल्या व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम, ट्वीटवर फेक लिंक येते. ती डाऊनलोड करायला सांगतात. मग ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पर्सनल माहिती देण्याची सांगितले जाते. या माहितीद्वारे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात.

३ अनेकांना कुठेही कोणताही फाॅर्म भरलेला नसला, तरी मोबाइलवर मोठ्या रकमेची लॉटरी लागली आहे, एवढी रक्कम भरा म्हणून आपला डेबीट कार्ड क्रमांक, पिन विचारला जाऊ शकतो. असे केल्याने तुमच्या माहितीद्वारे ही फेक मंडळी तुमच्या पैशावर डल्ला मारू शकतात.

४ सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. याद्वारे आपली ओळख वाढवून तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

----

दररोज किमान चार जण तरी फसतात

- वाढती बेरोजगारी यामुळे झटपट पैसा मिळवण्याच्या नादात फेक मंडळी लोकांचा गैरफायदा घेऊन फसवण्याचे प्रयत्न करतात. मात्र, आपण अशा प्रकारांना बळी न पडता आपली कोणतीही माहिती शेअर नाही केली तरी असे प्रकार घडणार नाहीत. सध्या सायबर यंत्रणेकडे दररोज तीन ते चार तरी अशा प्रकारची तक्रारी येतात. यासाठी खबरदारी घ्यावी.

- विसेंद्र बायस, पोलीस उपनिरीक्षक

-----

Web Title: Don't give your price mobile to anyone;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.