जगाच्या पोशिंद्याला वीजबिलासाठी छळू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:17+5:302021-03-20T04:21:17+5:30
थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन बंद करणे ट्रान्सफाॅर्मर बंद ठेवणे या कारवाईला शेतकरी संघटनेने तीव्र विरोध केला. ऐन ...
थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन बंद करणे ट्रान्सफाॅर्मर बंद ठेवणे या कारवाईला शेतकरी संघटनेने तीव्र विरोध केला. ऐन उन्हाळ्यात वीज बिलाच्या वसुलीचे निमित्त करून शासन शेतकऱ्यांचा छळ करीत आहे. हा छळ थांबवला नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांनी दिला
शेती पंपाची वीज कपात करू नका, लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे अशा स्थितीत शेतकऱ्यांना न्याय देण्यापेक्षा वीज तोडून त्यांचे नुकसान केले जात आहे, असा आरोप महामुद पटेल, उमाशंकर पाटील डॉ. शिवानंद झळके , बिळेणी सुंटे यांनी केला. तासभर घोषणा देत कामती ते मंद्रूप महामार्ग रोखून धरण्यात आला.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते इक्बाल मुजावर, भारतीय किसान संघाचे डॉ शिवानंद झळकी, कलशेट्टी निंगप्पा गुजरे इस्माईल मकानदार चांद साहब यादगिरी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.