कोरोना निर्मूलनाचा लढा यशस्वी करण्यासाठी कोणतीही उणीव ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:14+5:302021-05-14T04:22:14+5:30
बुधवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करुन त्यांनी विविध तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. त्या त्या तालुक्यातील ...
बुधवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करुन त्यांनी विविध तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. त्या त्या तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी या संकटकाळात जनतेच्या संपर्कात राहून काम करीत आहेत. अधिकारी आणि शिवसैनिकांनी समन्वय राखून उपायोजना कराव्यात अशी अपेक्षाही आ. सावंत यांनी विविध तालुक्यात बैठकांच्या माध्यमातून केली आहे.
तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कोरोना बाबतच्या उपायोजना, ऑक्सिजन, रेमडेसिविर, लस उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणी, राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळण्याबाबत अडचणी जाणून घेतल्या तर ग्रामीण भागातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठिकठिकाणी जनजागृती करण्याच्या सूचना केल्या.
---
यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, सह. गटविकास अधिकारी पिसे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोलीस निरीक्षक अरुण पवार, आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. जावळे आदी उपस्थित होते. तर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
---
सेनेच्या वतीने हेल्पलाईन
कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक गावात शिवसेनेच्या वतीने हेल्पलाईन सेंटर सुरु केले जातील. त्यास प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, त्याच बरोबर कोरोना रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने दर निश्चित केले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जावी, बिलांची तपासणी केली जावी अशा सूचना ही त्यांनी प्रशासनाला केल्या.
स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दाळ
पंढरपूर येथील विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी पंढरपूर, मंगळवेढा,माळशिरस व सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात कोरोना रुग्णावर उपचाराबाबत येणाऱ्या अडचणी मांडल्या, तर स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा करण्यात येणारी डाळ निकृष्ट गेल्यावर्षीचा साठा असून वितरणासाठी डाळ बदलून मिळावी अशी मागणी केली.