वाहनधारकांना दिलासा; जाणून घ्या काय आहे तो पोलिस अधीक्षकांचा चांगला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 03:12 PM2021-03-03T15:12:03+5:302021-03-03T15:12:10+5:30
सोलापूर - दशविधी, लग्न, वारकरी दिंडी, धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या वाहनांना विनाकारण अडवून त्रास देऊ नये. वाहतूक शाखेच्या पोलिस अंमलदारांनी संशयास्पद ...
सोलापूर - दशविधी, लग्न, वारकरी दिंडी, धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या वाहनांना विनाकारण अडवून त्रास देऊ नये. वाहतूक शाखेच्या पोलिस अंमलदारांनी संशयास्पद वाटणाऱ्या तथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर निश्चितपणे कारवाई करावी. विनाकारण त्रास देणाऱ्यांबद्दल तक्रार प्राप्त झाली आणि त्यात तथ्य असल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.
विनाकारण वाहन अडवून कागदपत्रांची मागणी केली जाते. काही ठिकाणी गैरप्रकाराच्या तक्रारीही ऐकावयास मिळतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ नये, यादृष्टीने सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलिस अंमलदारांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
वाहनचालकांनी "या' नंबरवर करावी तक्रार
महामार्गांवर तथा राज्य मार्गांवर सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार विनाकारण दुचाकी, चारचाकी अथवा परराज्यातील वाहने अडवून त्यांना त्रास देत असल्यास संबंधित वाहनचालकांनी 0217-2732000 व 0217-2732009 आणि 0217-2732010 या क्रमांकांवर संपर्क करावा. तर 7264885901 आणि 7264885902 या व्हॉट्सऍप क्रमांकावरही फोटोद्वारे तक्रार नोंदविता येणार आहे.