सोलापूर विद्यापीठात म्हणे देवदेवतांचे फोटो नकोत...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:25 PM2019-12-13T13:25:17+5:302019-12-13T13:27:01+5:30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने काढले परिपत्रक

Don't want photos of deities at Solapur University ...! | सोलापूर विद्यापीठात म्हणे देवदेवतांचे फोटो नकोत...!

सोलापूर विद्यापीठात म्हणे देवदेवतांचे फोटो नकोत...!

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठ अनेक कारणांमुळे चर्चेतआदेशामुळे कर्मचाºयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहेकर्मचाºयांनी जेवणाच्या सुटीतही विद्यापीठाच्या दबावाखाली काम

रुपेश हेळवे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सातत्याने कोणत्या ना कोणत्या वादाने चर्चेत येत आहे. आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फूटले आहे. आता नव्यानेच काढलेल्या परिपत्रकानुसार विद्यापीठात कोणत्याही देवदेवतांचे फोटो लावू नयेत, असल्यास ते काढून काढून टाकावेत, असे म्हटले आहे. याचबरोबर  कर्मचाºयांनी कोठे जेवण करावे अन् कोठे नाही असाही फतवा  या पत्रकाद्वारे काढण्यात आला आहे. या प्रकारामुळे कर्मचारी वैतागले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठ अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहे़ यामध्ये कधी विद्यापीठाने प्रस्थापित केलेली खरेदी कमिटी असो वा मुलाला पास करण्यासाठी केलेल्या अधिकाराचा केलेला गैरप्रकार असो.  यंदाही विद्यापीठाने असाच निर्णय काढला आहे़ विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच एक लेखी आदेश परिपत्रकाद्वारे काढला आहे़ यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, विद्यापीठातील विविध संकु ले, विभाग, विद्यापीठ वाहन, इमारत, आॅफिस टेबल आदी ठिकाणी विविध देवदेवतांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत़ ती त्वरित काढण्यात यावीत.  

याचबरोबर कर्मचाºयांनी कोठे जेवण करावे, याचे निर्देशही या पत्रात दिले आहेत. अशा आदेशामुळे कर्मचाºयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, तर दुसरीकडे कर्मचाºयांनी जेवणाच्या सुटीतही विद्यापीठाच्या दबावाखाली काम करावे का, असा प्रश्न कर्मचारी खासगीमध्ये एकमेकांना विचारु लागले आहेत. 

हिरवळीवर जेवता नाही येणार
- विद्यापीठातील महिला आणि पुरुष अधिकारी आणि कर्मचारी वर्ग दुपारच्या जेवणासाठी विद्यापीठातील हिरवळीवर बसतात़ पण विद्यापीठाने लेखी आदेश काढत महिला आणि पुरुष कर्मचाºयांनी वेगवेगळ्या ठिकाणी बसून जेवण करावे. यासाठी महिला कर्मचाºयांनी मुलींच्या मेसमध्ये तर पुरुष कर्मचाºयांनी मुलांच्या मेसमध्ये जेवण करावे, असे आदेशात म्हटले आहे़ 

बंधने घातली तर एकोपा कसा राहणार?
- विद्यापीठातील प्रत्येक विभाग हे दूर अंतरावर आहेत. तेथून मेसपर्यंत जाण्यासाठी विलंब होतो. एकतर जेवणासाठी फक्त अर्धा तासाचा वेळ असतो़ यामध्ये जाण्या-येण्यातच वेळ गेला तर जेवण केव्हा करायचे? अशा प्रकारे कर्मचाºयांवर सारखी बंधन घालण्यात येत असतील तर कर्मचाºयांनी एकोप्याने कामे करायची, असा सवाल कर्मचाºयांकडून होऊ लागला आहे.

देवदेवतांचे फोटो विद्यापीठात लावू नयेत, यासंबंधी विद्यापीठाने पत्रक काढले आहे़ या संदर्भात एका संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केली होती़ यामुळे याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे़ 
- डॉ़. विकास घुटे
कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ 

Web Title: Don't want photos of deities at Solapur University ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.