बदामी रेल्वे मार्गावर दुहेरीची कामे; १५ फेब्रुवारीपर्यंत कर्नाटक गाड्या रद्द

By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 8, 2023 06:20 PM2023-02-08T18:20:20+5:302023-02-08T18:20:29+5:30

बाळकृष्ण दोड्डी  सोलापूर : हुबळी विभागाच्या गुलेदगुद्दा रोड-बदामी सेक्शन यादरम्यान दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू असून, या मार्गावर धावणाऱ्या ...

Double works on Badami railway line; Karnataka trains canceled till February 15 | बदामी रेल्वे मार्गावर दुहेरीची कामे; १५ फेब्रुवारीपर्यंत कर्नाटक गाड्या रद्द

बदामी रेल्वे मार्गावर दुहेरीची कामे; १५ फेब्रुवारीपर्यंत कर्नाटक गाड्या रद्द

googlenewsNext

बाळकृष्ण दोड्डी 

सोलापूर : हुबळी विभागाच्या गुलेदगुद्दा रोड-बदामी सेक्शन यादरम्यान दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू असून, या मार्गावर धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल केल्याची माहिती साेलापूर रेल्वे विभागाने दिली आहे. दुहेरी मार्गाचे काम सुरू असल्याने ट्रॅफिक ब्लॉक होणार आहे. त्यामुळे कर्नाटककडे नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्या मंगळवारपासून रद्द करण्यात आल्या आहेत.

मंगळवार, ७ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सोलापूर ते हुबळी एक्स्प्रेस (क्र. ०७३३१) ही गाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत हुबळी सोलापूर एक्स्प्रेस (क्र. ०७३३२), ७ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सोलापूर ते गदग एक्स्प्रेस (क्र. ११३०५) व गदग ते सोलापूर एक्स्प्रेस (क्र. ११३०६) या गाड्याही रद्द झाल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- गदग एक्स्प्रेस (क्र. १११३९) ही गाडी १५ फेब्रुवारीपर्यंत बांका घाट स्थानकापर्यंतच धावणार आहे तसेच गदग- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (क्र. १११४०) ही गाडी ८ ते १६ फेब्रुवारीपर्यंत बांका घाट स्थानकाहून नियोजित वेळेनुसार धावणार आहे.

Web Title: Double works on Badami railway line; Karnataka trains canceled till February 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.