डीपीसी निवडणूक : सत्ताधारी गटाचे रणजितसिंह शिंदे पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 04:00 PM2017-08-04T16:00:12+5:302017-08-04T16:00:35+5:30
सोलापूर दि ४ : जिल्हा नियोजन समितीच्या आठ जागांसाठी झालेल्या मतमोजणीअखेर नगर पालिका गटातून मंगळवेढा नगर पालिकेतील राष्टÑवादीचे पक्षनेते अजीत जगताप विजयी झाले. तर, जिल्हा परिषद गटातून सत्ताधारी गटाचे उमेदवार रणजितसिंग पाटील यांचा अनपेक्षित पराभव झाला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ४ : जिल्हा नियोजन समितीच्या आठ जागांसाठी झालेल्या मतमोजणीअखेर नगर पालिका गटातून मंगळवेढा नगर पालिकेतील राष्टÑवादीचे पक्षनेते अजीत जगताप विजयी झाले. तर, जिल्हा परिषद गटातून सत्ताधारी गटाचे उमेदवार रणजितसिंग पाटील यांचा अनपेक्षित पराभव झाला.
सकाळी १० वाजता छत्रपती रंगभवनमधील राजस्व सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभी नगर पालिका गटाची मतमोजणी करण्यात आली. नगरपालिका प्रवर्गासाठी असलेल्या २२७ मतदारांपैकी २०७ सदस्यांनी मतदान केले. त्यातील १० मतपत्रिका बाद झाल्याने १९५ वैध मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. जीन उमेदवारांमधून म़ंगळवेढाचे नगरसेवक अजित जगताप यांनी ९८ मते मिळवून विजय संपादन केला. येथीलच शिवसेनेचे नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी यांना ९४ मते मिळाली. तर, मैदर्गीचे नगरसेवक हणमंत आलुरे यांना फक्त तीन मते मिळाली.
जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागले. सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. ६८ पैकी ६७ सदस्यांनी मतदान केले. तर, पहिल्याच फेरीत एक मत बाद झाल्याने ६६ मतांची मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत विजयासाठी ८२६ असा कोटा ठरविण्यात आला. निमगाव येथील रणजितसिंह शिंदे यांना सहाव्या फेरीअखेर सर्वात कमी म्हणजे ७८५ मते मिळाल्याने त्यांना पराभूत घोषित करण्यात आले. मतमोजणीच्या एकून सात फेºया झाल्या. पहिल्याच फेरीत सचिन देशमुख (कोळे), अतुल पवार (मेथवडे), उमेश पाटील (तोरणागड) आणि भारत शिंदे (अरण) यांनी कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. सचिन देशमुख यांना सर्वाधिक एक हजार ३०० मते मिळाली. तर, अतुल पवार, उमेश पाटील आणि भारत शिंदे यांना प्रत्येकी ९०० मते मिळली.
---------------
निळकंठ देशमुख आणि रणजितसिंंह शिंदे यांच्यात चुरस
निळकंठ देशमुख आणि रणजितसिंंह शिंदे यांच्यात अखेरपर्यत चुरस होती. वांगीचे निळकंठ देशमुख आणि कासेगावचे वसंतराव देशमुख यांना पहिल्या फेरीत प्रत्येकी ७०० मते मिळाली. दुसºया फेरीत मात्र वसंतराव देशमुख यांनी कोटा पूर्ण करून ८३४ मते मिळविली. त्यामुळे ते विजयी झाले. दुसºया फेरीत बळीराम साठे यांनीही कोटा पूर्ण केल्याने ते विजयी झाले. त्यामुळे विजयासाठी निळकंठ देशमुख आणि रणजितसिंंह शिंदे या दोघांतच स्पर्धा सुरू होती. पहिल्या फेरीपासूनच रणजितसिंह शिंदे मागे पडले. या फेरीत त्यांना ६०० मते मिळली. तर निळकंठ देशमुख यांनी ७०० मते घेतली. दुसºया फेरीत शिंदे यांना एकही मत मिळाले नाही. देशमुखांनी ७६७ मते घेतली. तिसºया फेरीत शिंदे यांना ६७४ व चवथ्या फेरीत ७४६,मते घेतली. तर, देशमुखांना तिसºया व चवथ्या फेरीत एकही मत मिळाले नाही. पाचºया फेरीत मात्र ८२१ मते घेवून ते विजयाचञया जवळ पोहचले. शिंदे यांना या फेरीत ७६४ मते मिळाली. सहावी फेरी विजयाचे चित्र स्पष्ट करणारी ठरली. शिंदे या फेरीत ७८५ मतांवर थांबले, तर निळकंठ देशमुखांनी ८४२ मते घेवून कोटा पार केला. त्यामुळे त्यांना विजयी करण्यात आले.
------------------
बळीराम साठेंची दुसºया फेरीत आघाडी
जिल्हा परिषदेतील विरोध पक्षनेते बळीराम साठी यांना पहिल्या फेरीत फक्त ६०० मते मिळाली होती. मात्र दुसºयजा फेरीतच ८६८ मते मिळवून त्यांनी विजय मिळविला. पहिल्या फेरीत ते मागे पडल्याने अनेकांच्या चेहºयावर चिंता पसरली होती. मात्र दुसºया फेरीतच तणाव दूर झाला.